सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आत्महत्येने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांनी वयाच्या ५८व्या वर्षी एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ‘हम दिल दे चुके सनम’, ‘माचिस’, ‘देवदास’, ‘लगान’, ‘जोधा अकबर’ या गाजलेल्या चित्रपटांचे कलादिग्दर्शन त्यांनी केले होते. नुकतंच नितीन देसाई यांची शेवटची इच्छा काय होती, याबद्दल एका कर्मचाऱ्याने खुलासा केला आहे.

नितीन देसाई यांच्या निधनानंतर एका कर्मचाऱ्याने एबीपी माझाशी संवाद साधला. या वेळी त्याने नितीन देसाई यांच्या निधनानंतर घडलेल्या घडामोडींबद्दल भाष्य केले. तसेच नितीन देसाईंच्या अंत्यसंस्काराबद्दलही सांगितले.
आणखी वाचा : “असा कसा नियतीचा खेळ…” ना. धों. महानोर यांच्या निधनानंतर सोनाली कुलकर्णी भावुक, म्हणाली “कालच्या धक्क्यातून…”

“नितीन दादांनी आम्हाला तू सकाळी ८.३० वाजता ये, माझ्या ऑफिसमध्ये एक रेकॉर्डर असेल, त्यात मी जे रेकॉर्ड केलं आहे ते तू चेक कर, असा मेसेज दिला होता. आम्हाला तो रेकॉर्डर सापडला. आम्ही ती पूर्ण रेकॉर्डिंग ऐकली नाही. तो रेकॉर्डर पोलिसांच्या स्वाधीन केला. मराठी पाऊल पडते पुढे या कार्यक्रमाचे जिथे सेटअप झालं होतं, तिथेच त्यांनी आत्महत्या केली.” असे तो म्हणाला.

आणखी वाचा : “मराठी पाऊल पडते पुढे’चा सेट, रस्सीच्या मदतीने बनवलेला धनुष्यबाण अन्…”, नितीन देसाईंच्या आत्महत्येनंतर कर्मचाऱ्याने केला धक्कादायक खुलासा

“नितीन दादांनी एक चिठ्ठी लिहिली आहे. त्यात त्यांनी त्यांची शेवटची इच्छा व्यक्त केली आहे. त्यावेळी त्यांनी माझा अंत्यविधी ६ नंबरचा ग्राऊंड आहे, तिथे हॅलिपॅड आहे, त्या ठिकाणी व्हावा”, अशी इच्छा सांगितली आहे. त्यामुळे नितीन देसाई यांच्या इच्छेनुसार एनडी स्टुडिओमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

आणखी वाचा : शिंदेशाहीतला एक तारा निखळला, आनंद शिंदेंच्या पुतण्याचं निधन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नितीन यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन मुंबईतील जेजे रुग्णालयात करण्यात आले. त्यांची मुलं अमेरिकेत असल्याने ते भारतात आल्यावरच देसाई यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.