scorecardresearch

Video : लग्नानंतर अथिया शेट्टी व केएल राहुलची जोरदार पार्टी, एकमेकांना केलं किस, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

अथिया शेट्टी व क्रिकेटपटू केएल राहुलची लग्नानंतर जोरदार पार्टी, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

athiya shetty kl rahul
अथिया शेट्टी व क्रिकेटपटू केएल राहुलची लग्नानंतर जोरदार पार्टी, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

सुनील शेट्टीची लेक अथिया शेट्टी व क्रिकेटपटू केएल राहुल २३ जानेवारीला विवाहबंधनात अडकले. अथिया व राहुलचा विवाहसोहळा सुनील शेट्टीच्या खंडाळा येथील फार्म हाऊसवर पार पडला. या दोघांच्या शाही विवाहसोहळ्याची सोशल मीडियावरही बरीच चर्चा रंगली. आता लग्नानंतरचे त्यांचे बरेच फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आणखी वाचा – Union Budget 2023 : केंद्रीय अर्थसंकल्पावर आरोह वेलणकरचं ट्वीट, म्हणाला, “अर्थपूर्ण आणि…”

लग्नानंतर अथिया व राहुल त्यांच्या खासगी वेळ एण्जॉय करताना दिसत आहेत. राहुलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे अथिया व त्याचा पार्टी करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दोघंही एकमेकांना किस करताना दिसत आहेत. तसेच दोघांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे.

या व्हिडीओमध्ये अथिया जीभ बाहेर काढत पोझ देताना दिसत आहे. तर राहुलही अथियाला प्रेमाने किस करत आहे. या व्हिडीओमध्ये दोघांचं एकमेकांवर किती प्रेम आहे हे दिसून येतं. शिवाय अथिया तिचं नवीन मंगळसुत्र फ्लॉन्ट करताना दिसत आहे. काळ्या मण्यांमधील अथियाचं मंगळसुत्र अगदी लक्षवेधी आहे.

आणखी वाचा – Video : सुप्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्याची माणुसकी पाहून ढसाढसा रडू लागली आजी; पाहा नेमकं घडलं तरी काय?

अथिया व राहुलची रिसेप्शन पार्टी अजूनही झालेली नाही. मेमध्ये या दोघांच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी असणार आहे. कारण सध्या तरी दोघंही त्यांच्या कामामध्ये व्यग्र आहेत. अथिया व राहुल दोघंही सध्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर करताना दिसतात.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-02-2023 at 17:14 IST
ताज्या बातम्या