केदार शिंदे दिग्दर्शित बाईपण भारी देवा हा चित्रपट ३० जूनला प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होऊन एक महिना उलटला आहे. मात्र तरीही या चित्रपटाची क्रेझ सर्वत्र पाहायला मिळत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करताना पाहायला मिळत आहे. आता या चित्रपटाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.

‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट सहा बहिणींची कथा आहे. या चित्रपटाची कथा, दिग्दर्शन, सर्व कलाकारांचा अभिनय याबरोबरच या चित्रपटातील गाण्यांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी महत्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत.
आणखी वाचा : शिंदेशाहीतला एक तारा निखळला, आनंद शिंदेंच्या पुतण्याचं निधन

हा चित्रपट प्रदर्शित होऊन ३५ दिवस उलटले आहेत. या चित्रपटाने ८३.५० कोटी रुपयाची कमाई केली आहे. त्यामुळे हा चित्रपट मराठीतील सुपरहिट चित्रपटांच्या यादीतील दुसरा चित्रपट ठरला आहे.

आणखी वाचा : “असा कसा नियतीचा खेळ…” ना. धों. महानोर यांच्या निधनानंतर सोनाली कुलकर्णी भावुक, म्हणाली “कालच्या धक्क्यातून…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला आहे. ‘वेड’ चित्रपटाचे एकूण कलेक्शन ८३.५० कोटी रुपये झाले होते.