भरत जाधव हा मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक अभिनेता आहे. गेली अनेक वर्ष ते त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालत आला आहे. नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमांत वैविध्यपूर्ण भूमिका उत्कृष्टपणे साकारत त्याने प्रेक्षकांचं प्रेम मिळवलं आहे. एकदा बाळासाहेब ठाकरे त्याच्या नाटकाच्या प्रयोगाला आले होते. यावेळचा एक किस्सा त्याने नुकताच ‘महाराष्ट्र टाईम्स’च्या मुलाखतीत सांगितला.

‘महाराष्ट्राची लोकधारा’, ‘आमच्यासारखे आम्हीच’, ‘सही रे सही’, ‘श्रीमंत दामोदर पंत’ अशा अनेक नाटकांमधून काम करत भरत गेली अनेक वर्ष रंगभूमीवरून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याच्या जवळपास प्रत्येक प्रयोगाला नाट्यगृहाच्या बाहेर हाउसफुलची पाटी लागते. एकदा त्याचं ‘सही रे सही’ नाटक पाहायला बाळासाहेब ठाकरे आले होते. ते नाटक पाहून त्यांची काय प्रतिक्रिया होती हे भरतने शेअर केलं.

BSP turned Congress leader Kunwar Danish Ali
पंतप्रधान मोदींचा हल्ला दानिश अलींसाठी कौतुकाचा विषय, काय म्हणाले अली?
sanjay raut arvind kejriwal
“केजरीवालांची तुरुंगात हत्या करण्याचा प्रयत्न?”, संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले “त्यांनी मला जेलमध्ये…”
Babasaheb Ambedkar published Mooknayak lyrics by Vamandada Kardak in the voice of Hariharan
एका वर्तमानपत्राचे गाणे होताना…! ‘मूकनायक’ या वामनदादा कर्डकांचे गीत हरिहरन यांच्या आवाजात; आज प्रसारण
Gajanan Kirtikar
शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तीकरांनी सुनावले; म्हणाले, “भाजपाला जनतेचा भक्कम पाठिंबा, ईडीचे प्रयोग थांबवले पाहिजे”

आणखी वाचा : “हे शहर आता…,” भरत जाधवने उघड केलं मुंबई सोडण्यामागचं खरं कारण

भरत जाधव म्हणाला, “बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा माझ्या नाटकाला उपस्थिती लावली होती तेव्हा त्यांची तब्येत बरी नव्हती. त्यांना इतका वेळ बसवेल की नाही अशी शंका वाटत होती. पण त्यांनी संपूर्ण नाटक पाहिलं. त्या रात्री मी राज ठाकरे साहेबांना फोन केला आणि त्यांना विचारलं की, बाळासाहेबांना नाटक कसं वाटलं? तेव्हा ते म्हणाले, ते घरी आल्यापासून गलगलेंसारखं बाळासाहेब उठले, बाळासाहेब निघाले असंच बोलत आहेत. गलगले या व्यक्तिरेखेचा त्यांच्यावर इतका प्रभाव पडला होता.”

हेही वाचा : “आम्हाला त्यांनी २ दिवस कोंडून ठेवले, जेवण दिले नाही अन्…”; ‘बलोच’च्या निर्मात्याने सांगितला शूटिंगदरम्यान आलेला भयानक अनुभव

बाळासाहेब ठाकरे त्यांच्याकडून मिळालेली ही प्रतिक्रिया भरत जाधवसाठी अविस्मरणीय होती. ही प्रतिक्रिया तो कधीही विसरू शकत नाही असंही त्याने सांगितलं.