मराठमोळी अभिनेत्री सायली संजीवचा आज वाढदिवस आहे. ‘काही दिया परदेस’ मालिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या सायलीने चित्रपट व नाटकांतही काम केलं आहे. अल्पावधीतच सायलीने कलाविश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.  ‘पैठणी’, ‘बस्ता’, ‘हर हर महादेव’ चित्रपटांतून तिने अभिनयाचा ठसा उमटवला.

उत्तम अभिनेत्री म्हणून ओळख मिळवलेली सायली बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानची मोठी चाहती आहे. एका कार्यक्रमादरम्यान सायली व शाहरुख खानची भेट झाली होती. सायलीने एका मुलाखतीदरम्यान शाहरुख खान भेटीचा किस्सा सांगितला होता. सायलीच्या मित्राच्या लग्नसोहळ्यात तिची शाहरुख खानशी भेट झाली होती.

हेही वाचा>> ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातची लगीनघाई! मेहेंदी सोहळ्याचे फोटो व्हायरल

शाहरुख खान भेटीचा किस्सा सांगताना सायली म्हणाली, “मी माझ्या मित्राच्या लग्नाला गेले होते. लग्न आणि रिसेप्शन झाल्यानंतर मी तिथून निघण्याच्या तयारीत होते. पण हॉटेलमधील सगळ्या लिफ्ट बंद करुन ठेवल्या होत्या. त्यामुळे मी तिथेच अडकून पडले होते. याचा विचार करत असतानाच एक व्यक्ती माझ्या डोळ्यासमोरुन आत गेली. तो शाहरुख खान होता. मी वेड्यासारखी बघत उभे होते. माझ्या मित्राला आणि त्याच्या कुटुंबियांना भेटून शाहरुख बाहेर आला. माझ्या मित्राने त्याला माझी ओळख करुन दिली. त्यानंतर माझा हात हातात घेऊन तो बोलत होता. पण मी नुसतेच शाहरुखकडे पाहत होते. तो काय बोलला, यातलं मला एक अक्षरही आठवत नाही. पण कोणीतरी हे सुंदर क्षण कॅमेऱ्यात टिपले. आणि याचे सगळे फोटो माझ्याकडे आहेत”.

हेही वाचा>> विशाखा सुभेदारच्या डान्स व्हिडीओवर गणेश आचार्यांची कमेंट, अभिनेत्रीने भारावून शेअर केली पोस्ट, म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सायली ‘हर हर महादेव’ नंतर आता ‘झिम्मा २’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘झिम्मा’ या चित्रपटाचा हा सिक्वेल असणार आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागतही सायलीने महत्त्वाची भूमिका साकारली होती.