मराठी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक चित्रपटांची लाट आली आहे. ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘हर हर महादेव’, ‘शिवप्रताप गरुडझेप’ या चित्रपटानंतर आता आणखी एक चित्रपट येत आहे. दिग्दर्शक महेश मांजेरकर यांच्या आगामी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचा शुभारंभ सोहळा नुकताच पार पडला.  

महेश मांजेरकरांच्या या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची वर्णी लागली आहे. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटात अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील अक्षय कुमारच्या फर्स्ट लूकची झलक यावेळी दाखवण्यात आली. ‘वीर दौडले सात’ चित्रपटाच्या शुभारंभ सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती दर्शविली. हा चित्रपट २०२३मध्ये प्रदर्शित होणार आहे.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा >> ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेता झळकणार मराठी चित्रपटात, पोस्ट शेअर करत म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटात अभिनेता दिग्दर्शक प्रविण तरडे महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. याबरोबरच बिग बॉस फेम जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे आणि विशाल कदम यांचीही चित्रपटात वर्णी लागली आहे. तुझ्यात जीव रंगला मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता हार्दिक जोशीही महेश मांजरेकरांच्या या चित्रपटात झळकणार आहे.