प्रशांत दळवी लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘चारचौघी’ नाटक रंगभूमीवर सध्या जोरदार सुरू आहे. अभिनेत्री मुक्ता बर्वे, रोहिणी हट्टंगडी, कादंबरी कदम, पर्ण पेठे, निनाद लिमये, श्रेयस राजे, पार्थ केतकर असे तगडे कलाकार मंडळी असलेलं हे नाटक रसिक प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस पडलं आहे. त्यामुळे नाटकाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. अशातच या नाटकातील एक अभिनेता लग्नबंधनात अडकला आहे. याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत.

‘चारचौघी’ या नाटकातील अभिनेता पार्थ केतकरने मानसी नाटू हिच्याशी लग्नगाठ बांधली आहे. पार्थचा समारंभपूर्वक लग्नसोहळा पार पडला आहे. या लग्नसोहळ्यात मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार मंडळी उपस्थित होते. या कलाकारांनी सोशल मीडियावर पार्थच्या लग्नाचे फोटो शेअर करून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा – आयरा खानपेक्षा श्रीमंत आहे नुपूर शिखरे, लग्नानंतर दोघं आहेत ‘इतक्या’ संपत्तीचे मालक

पार्थच्या लग्नासाठी ‘चारचौघी’ नाटकातील कलाकारांनी खास लूक केला होता. मुक्ता, पर्ण, कादंबरीसह रोहिणी हट्टंगडी यांनी छान साडी नेसली होती. याचे फोटो पर्ण पेठेने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत; जे चांगलेच चर्चेत आले आहेत.

हेही वाचा – Video: ‘अ‍ॅनिमल’च्या सक्सेस पार्टीत रणबीर कपूरने रश्मिका मंदानाला केलं किस, व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘चारचौघी’ या मूळ नाटकाचा पहिला प्रयोग मराठी रंगभूमीवर १९९१ रोजी सादर झाला होता. यामध्ये दीपा श्रीराम, वंदना गुप्ते, आसावरी जोशी आणि प्रतीक्षा लोणकर यांनी प्रमुख भूमिका निभावल्या होत्या.