केदार शिंदे दिग्दर्शित बाईपण भारी देवा हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केली. नुकतंच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पत्नी अंजलीसह बाईपण भारी देवा हा चित्रपट पाहिला. यानंतर त्याने या चित्रपटातील कलाकारांचे कौतुक केले. यावेळी अभिनेत्री दीपा परब आणि सचिन तेंडुलकरने व्हिडीओ कॉलद्वारे एकमेकांशी संवाद साधला. यावेळीची एक पोस्ट दीपाने केली आहे.

केदार शिंदे यांनी राज ठाकरे आणि सचिन तेंडुलकर यांच्यासाठी एका खास शोचे आयोजन केले होते. यावेळी सचिन तेंडुलकरने पत्नी अंजलीसह हजेरी लावली. यावेळी मालिकेचे निर्माते, कलाकार उपस्थित होते. मात्र दीपा परब ही मालिकेच्या चित्रीकरणात व्यस्त असल्याने तिला उपस्थित राहणं शक्य झालं नाही.
आणखी वाचा : सचिन तेंडुलकरने पत्नीसह पाहिला ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट, म्हणाला “माझी आई आणि मावशी…”

Kareena Kapoor Khans wax figure a woman first reaction goes viral on social media
VIDEO : करीना कपूरला पाहताच महिलेनी केले असे कृत्य…; व्हिडीओ होतोय व्हायरल
ipl 2024 dhruv jurel salute his father ekana stadium wins heart sanju samson rr vs lsg
PHOTO : मुलगा धुव्र जुरेलची प्रत्यक्ष खेळी पाहून गर्वाने फुलली सैनिक वडिलांची छाती; मुलाचीही अर्धशतकाद्वारे वडिलांना सलामी!
salman khan reaction on shahrukh khan song
Video: घरावरील हल्ल्यानंतर सलमान खान दुबईत, शाहरुख खानचं गाणं वाजताच भाईजानने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
Suresh Raina Helps Limping ms dhoni Viral Video
IPL 2024: चालताना त्रास होणाऱ्या धोनीला सुरेश रैन्नाने दिला आधार, व्हीडिओ होतोय तुफान व्हायरल

‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट पाहिल्यानंतर अभिनेत्री दीपा परबशी सचिन तेंडुलकरने संवाद साधला. यावेळी त्याने तिचे तोंडभरुन कौतुक केले. त्यावर दीपानेही धन्यवाद असं म्हटलं.

दीपा परबची पोस्ट

“THE DREAM COME TRUE MOMENT
सचिन… द सचिन तेंडुलकर… लाखो-करोडो चाहते आहेत त्यांचे, मी देखील त्यांच्यापैकीच एक. त्यांची भेट होणं… ही माझ्यासाठी खरंच एक फॅन मोमेंट आहे. ‘बाई पण भारी देवा’ चित्रपटाने खरंच आम्हाला भरपूर काही दिलंय, पण सचिन तेंडुलकर येऊन चित्रपट बघतील… त्यांना तो आवडेल आणि त्याचं ते इतकं कौतुक देखील करतील याचा आम्ही कोणीही स्वप्नांत देखील विचार नव्हता केला.

पण…YES…It’s Fact… शब्दांत न मांडता येणारा पण आयुष्यभरासाठी मनावर कोरला गेलेला हा एक क्षण. मालिकेच्या शूटिंग मध्ये व्यस्त असल्यामुळे मला प्रत्यक्ष स्क्रीनिंगला जाता आले नाही. ज्या व्यक्तीला आयुष्यात एकदा तरी भेटायची इच्छा होती त्याला भेटण्याची संधी समोरून चालून आलेली असता मी त्या संधीला मुकले असं वाटत असतानाच मला व्हिडीओ कॉल येतो… आणि प्रत्यक्ष सचिन तेंडुलकर यांच्याशी संवाद साधला जातो…

आम्हा सर्व जणींचा अभिनय, चित्रपट त्यांना आवडला हे ऐकून खूप छान वाटलं… अजूनही हे सर्व काही स्वप्नवतचं आहे. THANK YOU निखिल साने आणि अजित भुरे आयुष्यभर लक्षात राहणाऱ्या ह्या एका अविस्मरणीय फोन साठी”, असे दीपा परबने म्हटले आहे.

आणखी वाचा : ‘बाईपण भारी देवा’ची रितेश देशमुखच्या ‘वेड’ला टक्कर, ३५ दिवसात कमावले इतके कोटी

दरम्यान दीपा परबने या चित्रपटात चारु ही भूमिका साकारली आहे. तिच्या या भूमिकेचे सर्वजण कौतुक करताना दिसत आहेत. या चित्रपटात सहा बहिणींची कथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाची कथा, दिग्दर्शन, सर्व कलाकारांचा अभिनय याबरोबरच या चित्रपटातील गाण्यांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी महत्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत.