‘मुळशी पॅटर्न’, ‘धर्मवीर’सारख्या चित्रपटातून आपली ओळख निर्माण करणारा अभिनेता म्हणजे क्षितिश दाते, आता ‘लोकमान्य’ मालिकेतून आपल्या भेटीस आला आहे. या मालिकेत तो लोकमान्य टिळकांच्या भूमिकेत दिसणार आहे. क्षितिश अभिनयाच्याबरोबरीने सोशल मीडियावरदेखील सक्रीय असतो. नुकतीच त्याने धर्मवीर चित्रपटाबद्दलची पोस्ट शेअर केली आहे.

प्रसाद ओकची मुख्य भूमिका असलेला धर्मवीर चित्रपट मागच्या वर्षी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई केली होती. याच चित्रपटात क्षितिश दाते झळकला होता. याच चित्रपटातील त्याने एका सीनचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत प्रसाद ओक आणि क्षितिश दाते दिसत आहेत. धर्मवीर चित्रपटातील भावनिक सीन आहे. त्याने कॅप्शन लिहला आहे, “हा सीन चित्रित करून एक वर्ष पूर्ण झालं.. कुणी कुणी धर्मवीर पाहिलाय का? आठवतो हा सीन?”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘धर्मवीर’ चित्रपट स्व. आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट होता. अभिनेता दिग्दर्शक प्रसाद ओक याने आनंद दिघेंची भूमिका साकारली तर क्षितिश दातेने सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारली होती. प्रवीण तरडे यांनी लेखन, दिग्दर्शन अशा दोन्ही जबाबदाऱ्या उत्तमरित्या पार पाडल्या आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता.