अभिनेत्री मधुरा वेलणकर-साटम आणि अभिनेते तुषार दळवी मराठी व्यावसायिक रंगभूमीवर पुनरागमन करत आहेत. विजय केंकरे दिग्दर्शित ‘आपण यांना पाहिलंत का?’ या नव्याकोऱ्या नाटकात मधुरा आणि तुषार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. अभिनेत्री मधुरा साटम ही ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांची सून आहे. आतापर्यंत तिने ‘गोजिरी’, ‘हापूस’, ‘मी अमृता बोलतेय’ अशा अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

‘आपण यांना पाहिलंत का?’ या नव्या नाटकाची निर्मिती आदिती देवेंद्र राव, वैशाली धनेश पोतदार यांनी केली आहे. तसेच सुशील स्वामी यांनी या नाटकाचं लेखन केलं आहे. आपल्या सुखी संसाराला कोणाची दृष्ट लागू नये असं चाळीशीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या प्रत्येक जोडप्याला वाटतं. संसारात एकत्र आहोत म्हणजे सगळं शांत आणि निवांत. असं खरंच असतं का? या विषयावर हे नाटक भाष्य करणार आहे. परंतु, या जोडप्याच्या सुखी संसारात आणि आयुष्यात अचानकपणे एक वादळ येतं. या वादळाच्या येण्यानं त्या जोडप्याच्या नात्याचं, त्यांच्या संसाराचं काय होतं? याची नर्म विनोदी गोष्ट ‘आपण यांना पाहिलंत का?’ या नाटकाद्वारे प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

हेही वाचा : “चार लोकांमध्ये गेल्यावर…”, बिकिनीवरुन ट्रोल करणाऱ्यांना प्रिया बापटचं स्पष्ट उत्तर; म्हणाली, “मराठी संस्कृती…”

तुषार दळवी आणि मधुरा वेलणकर साटम यांच्यासह विक्रम गायकवाड, श्रुती पाटील यांच्या या नाटकात भूमिका आहेत. अजित परब यांनी नाटकाचं संगीत, शीतल तळपदे यांनी प्रकाश योजना, मंगल केंकरे यांनी वेशभूषा, संदेश बेंद्रे यांनी नेपथ्याची जबाबदारी सांभाळली आहे.

हेही वाचा : नम्रता संभेरावच्या अभिनयाला वडिलांचा होता विरोध; खुलासा करत म्हणाली, “मी ठरवलं होतं की…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे यांनी पती-पत्नीच्या नात्याचा वेध घेणारी अनेक नाटकं दिग्दर्शित केली आहेत. ते त्यांच्या नाटकांमधून आजच्या काळावर भाष्य करण्यास प्राधान्य करतात. त्यामुळे ‘आपण यांना पाहिलंत का?’ या नाटकाबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.