मराठी अभिनेता गश्मीर महाजनी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तो त्याचे फोटो, व्हिडीओ व कामाबद्दलच्या अपडेट्स सोशल मीडियावरून शेअर करत असतो. इतकंच नाही तर तो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतो. बऱ्याचदा तो चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत असतो.

“तरुणपणी खूप उद्दाम होतं, म्हातारं झालं आणि लाचार…”, गश्मीर महाजनीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

दर रविवारी गश्मीर इन्स्टाग्रामवर चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतो. १७ सप्टेंबरला रविवार असल्याने गश्मीरने इन्स्टाग्रामवर ‘As Gash’ ठेवलं होतं. त्यावेळी त्याला चाहत्याने एक प्रश्न विचारला. त्यावर त्याने उत्तर दिलं. ‘तुला पृथ्वीवरून कोणती गोष्ट डिलिट करायला आवडेल? प्लीज ट्विटर म्हणू नकोस’ असं चाहत्याने विचारलं. त्यावर गश्मीरने ‘आदिपुरुष’ चित्रपटाचं नाव घेतलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Gashmeer Mahajani on adipurush
गश्मीर महाजनीची इन्स्टाग्राम स्टोरी (फोटो – स्क्रीनशॉट)

दरम्यान, मराठी चित्रपटांसह हिंदी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या गश्मीरने वडील रवींद्र महाजनींच्या निधनानंतर कामापासून ब्रेक घेतला आहे. तो ऑक्टोबर महिन्यात त्याच्या कामाला पुन्हा सुरुवात करणार आहे. त्याने काही दिवसांपूर्वीच याबाबत माहिती दिली होती. गश्मीर पुन्हा एकदा एका ऐतिहासिक भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण त्याने चित्रपटाचं नाव किंवा भूमिकेबद्दल अद्याप काही सांगितलं नाही. चित्रपट ऐतिहासिक असेल इतकंच तो म्हणाला होता.