अभिनेत्री गौतमी देशपांडे २५ डिसेंबरला ‘भाडिपा’ फेम कंटेंट क्रिएटर स्वानंद तेंडुलकरशी लग्नबंधनात अडकली. मेहंदी, हळद, संगीत, सप्तपदी, रिसेप्शन असा समारंभपूर्वक लग्नसोहळा गौतमी-स्वानंदचा झाला. सध्या दोघं मालदिव किंवा मनाली नाही तर कोकणात फिरत आहे. ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणजेच कोकण कन्या अंकिता वालावलकर गौतमी-स्वानंदला कोकण फिरवताना दिसत आहे. अशातच गौतमीची बहीण म्हणजे अभिनेत्री मृण्मयी देशपांडे नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टवरील एका प्रतिक्रियेने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे.
अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने गौतमी-स्वानंदच्या हळदीचा व्हिडीओ शेअर केला आहे. “गौतमीचं लग्न होणार…भाग-१…#SwaG #lafdi” असं कॅप्शन लिहित मृण्मयीने हळदीचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत गौतमीच्या हळदीमधील धमाल पाहायला मिळत आहे.
हेही वाचा – Premachi Goshta: मुक्ता-सागरच्या हनिमूनमध्ये झाली गडबड, वेटरने औषधाऐवजी दिलं भलंतच
मृण्मयीने शेअर केलेल्या या पोस्टवर एका चाहतीने तिला #lafdi या हॅशटॅगचा अर्थ काय आहे? असा प्रश्न विचारला आहे. यावर अभिनेत्री उत्तर देत चाहतीला म्हणाली, “प्लीज हा याबाबत स्वानंदला विचारा. मला पण माहित नाही. पण तो सारखं बोलतं असतो लफडी नकोय, लफडी नकोत.” मृण्मयीचा या उत्तरावर त्या चाहतीने हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.

हेही वाचा – “आणखी दिसायला हॉट, श्रीमंत…”, अभिनेत्री स्पृहा जोशीने सांगितले पुढील पाच वर्षांचे प्लॅन्स, म्हणाली…
दरम्यान, मृण्मयीने शेअर केलेल्या एका फोटोमुळेच गौतमी-स्वानंदचं अफेअर असल्याची चर्चा सुरू झाली होती. पण लग्न होईपर्यंत दोघांनी याबाबत मौन पाळलं. थेट मेहंदी समारंभाचे फोटो शेअर करून गौतमी-स्वानंदने प्रेमाची कबुली दिली.