बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. या प्रकरणावरून भाजपा आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर टीका करत असताना प्राजक्ता माळींसह काही अभिनेत्रींची नावं घेतली. त्यामुळे सध्या हे प्रकरण खूप चर्चेच आलं आहे. सुरेश धसांच्या विधानामुळे उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात प्राजक्ता माळीने २८ डिसेंबरला पत्रकार परिषद घेऊन आक्रमक पावित्रा घेतला. सुरेश धसांच्या विधानामुळे झालेला त्रास माध्यमांसमोर सांगितला. तसंच जाहीरपणे माफी मागावी, असं प्राजक्ता माळीने सांगितलं. या संपूर्ण प्रकरणावर नृत्यांगना गौतमी पाटीलने प्रतिक्रिया दिली आहे.

प्रसार माध्यमांशी संवाद साधताना गौतमी पाटील म्हणाली, “प्राजक्ता ताई, आम्ही सर्व कलाकार तुझ्याबरोबर आहोत. या गोष्टीवरून ट्रोल जरी केलं तरी लक्ष देऊ नकोस. तू पत्रकार परिषदेत जे काही बोलली ते मी मगाशी ऐकलं. तू जे काही बोलली ते सगळं बरोबर होतं. मी एक कलाकार आहे, तर माझी एक विनंती आहे, कलाकाराला कलाकाराच्या जागेवर राहू द्या. त्याला कुठल्याही नेत्याबरोबरच नाही, तर कोणाहीबरोबर त्या कलाकाराचं नाव जोडू नका. कलाकाराचं दुःख हे कलाकाराचं माहीत असतं.”

हेही वाचा – प्राजक्ता माळीच्या समर्थनार्थ उतरले ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाचे दिग्दर्शक, पोस्ट करत म्हणाले, “ज्या समाजात महिलांचा सन्मान…”

पुढे गौतमी पाटील म्हणाली की, आज कोणाला त्रास होतोय हे तुम्हाला माहीत नाही. आज त्या व्यक्तीलाच माहीत आहे. मला खूप ट्रोल केलं गेलं. बऱ्याच गोष्टींना मी ट्रोल झाली. पण माझा त्रास मलाच माहीत, लोकांना माहीत नाही. लोक आपापल्या घरात राहतात, ट्रोल करतात. जे चुकीच आहे. म्हणून प्लीज कोणाबरोबरही कोणाच नाव जोडू नका. कलाकाराला पाठिंबा द्या. त्याच्याबरोबर उभे राहा. जसं प्रेक्षक वर्ग आम्हा कलाकारांवर प्रेम करतात, तसंच प्राजक्ता ताईवर बरेच प्रेक्षक प्रेम करतात, म्हणून या गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस. आम्ही सगळेजण तुझ्याबरोबर आहे. अशीच तू पुढे जा, हसत राहा आणि खूप छान राहा.

हेही वाचा – फोटोतील ‘या’ दोन लोकप्रिय अभिनेत्यांना ओळखलंत का? लवकरच दोघांचा चित्रपट येतोय प्रेक्षकांच्या भेटीस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, याप्रकरणावरून प्राजक्ता माळी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहे. यावेळी सुरेश धस यांनी केलेले आरोप याची वस्तूस्थिती मुख्यमंत्र्यांसमोर मांडून कठोर कारवाई करण्याची मागणी असल्याचं प्राजक्ताने पत्रकार परिषदेत सांगितलं. तसंच याप्रकरणी महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली असल्याची माहिती प्राजक्ताने दिली. याशिवाय करुणा मुंडे यांनी केलेल्या आरोपांवर देखील अभिनेत्रीने आपलं मत मांडलं. “तुम्ही महिला आहात. तुम्ही महिलांना होणारा त्रास समजू शकता. त्यामुळे इथून पुढे तुम्ही कोणत्याही गोष्टीची खातरजमा केल्याशिवाय वक्तव्य करणार नाहीत, अशी खात्री बाळगते”, असं प्राजक्ता म्हणाली.