Hemant Dhome : ‘झिम्मा’ चित्रपटाचा पहिला भाग २०२१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यानंतर २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘झिम्मा २’ला देखील प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. ‘झिम्मा’च्या यशानंतर आता अभिनेता-दिग्दर्शक हेमंत ढोमेने दिवाळीच्या मुहूर्तावर नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. गेल्या काही दिवसांपासून हेमंत सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्याच्या आगामी चित्रपटाची हिंट चाहत्यांना देत होता. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचं पहिलं पोस्टर लॉन्च करण्यात आलं होतं. आता हेमंतने दिवाळीच्या मुहूर्तावर या नव्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.

हेमंत ढोमेच्या ( Hemant Dhome ) या नव्या चित्रपटाचं नाव ‘फसक्लास दाभाडे!’ असं आहे. हा सिनेमा दिग्दर्शकाने स्वतःच्या शेतात, स्वतःच्या मातीत शूट केलेला असल्याचं काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत सांगितलं होतं. याशिवाय चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरमध्ये क्षिती, सिद्धार्थ आणि अमेय वाघ ट्रॅक्टरवर बसून खळखळून हसत असल्याचं पाहायला मिळालं होतं. तेव्हापासून या सिनेमाबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर हेमंतने दिवाळीच्या शुभमुहूर्तावर नव्या चित्रपटाचं पोस्टर, यामध्ये झळकणारे कलाकार आणि प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.

हेही वाचा : तब्बल ११ वर्षांचं प्रेम, प्राजक्ताची साथ ते लग्न! पृथ्वीक प्रतापने लग्नाबद्दल स्वत:च केला खुलासा; म्हणाला, “२०१३ पासून…”

हेमंत ढोमेची नव्या चित्रपटासाठी पोस्ट

हेमंत ( Hemant Dhome ) पोस्ट शेअर करत लिहितो, “आपल्या फसक्लास दाभाडे कुटूंबाकडून आपल्याला व आपल्या कुटूंबाला दिपावलीच्या फसक्लास शुभेच्छा! झिम्माच्या टीमचा नवा सिनेमा ‘फसक्लास दाभाडे’ २४ जानेवारीपासून तुमच्या जवळच्या फसक्लास चित्रपटगृहात!”

‘फसक्लास दाभाडे!’ चित्रपटात अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, निवेदिता अशोक सराफ, हरीश दुधाडे, राजसी भावे, राजन बिसे आणि क्षिती जोग यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पुढच्या वर्षी म्हणजे २४ जानेवारी २०२५ रोजी हा बहुचर्चित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा : लग्नाच्या १४ व्या वाढदिवशी नव्या घरात गृहप्रवेश! विवेक ओबेरॉयचं पत्नीला खास गिफ्ट, प्रियांका आहे माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी

हेही वाचा : Video: ‘मुंज्या’, ‘स्त्री २’नंतर आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदानाच्या ‘थामा’ चित्रपटाची घोषणा, पाहायला मिळणार थरारक प्रेम कहाणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेमंतने ( Hemant Dhome ) दिवाळीच्या मुहूर्तावर या नव्या सिनेमाची घोषणा करताच मराठी कलाकारांनी या चित्रपटावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दरम्यान, हेमंतच्या यापूर्वीच्या ‘झिम्मा’, ‘झिम्मा २’ चित्रपटांनी प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं आहे. त्यामुळे या नव्या चित्रपटाकडून प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा आहेत.