Hruta Durgule on Lalit Prabhakar: लोकप्रिय अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि मराठी अभिनेता ललित प्रभाकर लवकरच ‘आरपार’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर पाहायला मिळाला. त्यानंतर दोन्ही कलाकारांवर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. आता हृता व ललित यांनी नुकतीच नवशक्तीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना एकमेकांबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला.

हृता दुर्गुळे म्हणाली…

हृता म्हणाली, “मला ललितबरोबर काम करायचं होतं. बऱ्याचदा असे प्रोजेक्ट्स आले की काहींमध्ये त्याला इंटरेस्ट वाटला नाही, काही प्रोजेक्टमध्ये मला इंटरेस्ट वाटला नाही. काही जुळून येत नव्हतं. मला असं वाटतं की आम्ही आरपारसाठीच थांबलो होतो. आता काम केल्यानंतर मला असं वाटतंय की ललितपेक्षा कोणी भारी सहकलाकार असूच शकत नाही. ललित खूप चांगला अभिनेता तर आहेच. पण, तो प्राणामिक आहे. मनापासून काम करतो.”

ललित प्रभाकर म्हणाला, “आम्ही शूटिंगच्या पहिल्या दिवसापासूनच एकमेकांबरोबर कन्फर्टेबल होतो. मला असं वाटतं की ते कामामुळे झालं. कामाकडे बघण्याचा आमच्या दोघांचाही जो दृष्टीकोण आहे, तो अत्यंत सारखा आहे. कामाकडून आपल्याला जे अपेक्षित आहे किंवा आपण कामाला जे देणं अपेक्षित आहे, त्या सगळ्यात माझ्याइतकीच तीदेखील तप्तर होती. मी सहनिर्माता होतो, म्हणून माझी जास्त जबाबदारी आहे, असं मला वाटलं नाही. कारण-ती तेवढ्याच जबाबदारीने ती सहभागी होती. मला ती गोष्ट आवडते की तुमचा सहभाग प्रत्येक गोष्टीत असला पाहिजे.”

पुढे अभिनेता म्हणाला, “त्यामुळे आमची केमिस्ट्री दिसतेय. स्क्रीप्टमुळे ती केमिस्ट्री खुलली. एका रोमँटिक फिल्ममध्ये जे जे करायला असू शकतं, ते सगळं या स्क्रिप्टमध्ये होतं.”

“मी खूप दिवसांपासून रोमँटिक चित्रपटाची वाट पाहत होतो. पण, माझी अपेक्षा अशी होती की मला जर लोकांना लव्हस्टोरी सांगायची आहे, ती आताच्या काळाशी निगडीत असायला हवी. प्रेक्षक म्हणून मला कशी वाटते, मला भिडतेय, अशा स्क्रिप्टच्या आम्ही शोधात होतो. शेवटी, आरपारची स्क्रिप्ट आली.”

दरम्यान, १२ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आता ही जोडी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.