मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री ऋता दुर्गुळे नेहमीच चर्चेत असते. ‘फुलपाखरू’ मालिकेतून ऋता घराघरांत पोहचली. ‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील तिची भूमिका चांगलीच गाजली. ‘महाराष्ट्राची क्रश’ म्हणून ऋताला ओळखले जाते. आपल्या अभिनयाच्या जोरावर ऋताने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे.

मे २०२२ साली ऋता दिग्दर्शक प्रतीक शाहशी लग्न केले. ऋता सासूही प्रसिद्ध अभिनेत्री आहे. हृताच्या सासूबाईंचे नाव मुग्धा शाह आहे. त्यांनी विविध मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमवटवला आहे. एका मुलाखतीत ऋताने तिचा अभिनय व चित्रपट बघून सासूबाईंची काय प्रतिक्रिया असते याबाबतचा खुलासा केला आहे.

हेही वाचा- Video: आता खऱ्या अर्थाने ‘प्रेमाची गोष्ट’ होणार सुरू, सागर मुक्ताला करणार प्रपोज!

अलीकडेच ऋताने राजसी मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या करिअरबरोबर वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले. या मुलाखतीत तुझा अभिनय बघून सासूबाईंची काय प्रतिक्रिया असते? असा प्रश्न ऋताला विचारण्यात, याला उत्तर देताना ती म्हणाली, “माझे आत्तापर्यंतचे सगळे चित्रपट माझ्या नवऱ्याच्या अगोदर सासूबाईंनी पाहिले आहेत. त्या खूप स्पष्टवकत्या आहेत. त्यांना नाही आवडलं तर त्या सरळ तोंडावर सांगतात.”

ऋता दुर्गुळेच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास आतापर्यंत तिने सुपरहिट मालिका व चित्रपटांमध्ये काम केले आहे. शुक्रवारी (ता. ८) ऋताचा ‘कन्नी’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर शुभंकर तावडे, अजिंक्य राऊत, वल्लरी विराज व ऋषी मनोहर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा- ओले काजूगर, सुंदर निसर्ग अन्…; प्रथमेश लघाटे पोहोचला आजोळी, शेअर केले कोकणातील सुंदर फोटो

ऋता दुर्गुळेने १८ मे २०२२ रोजी दिग्दर्शक प्रतीक शाहबरोबर लग्नगाठ बांधली. कुटुंबीय व मित्र परिवाराच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला. या लग्नाला मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. लग्नातील ऋता व प्रतीकचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.