तेजश्री प्रधान व राज हंचनाळे यांची ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असून मालिकेतील पात्र आता घराघरात पोहोचले आहेत. मुक्ता, सागर, सई, सावनी, हर्षवर्धन, इंद्रा कोळी, जयंत कोळी, माधवी, पुरू भाऊ अशा मालिकेतील सर्व पात्रांना प्रेक्षकांनी आपलंस केलं आहे. त्यामुळेच मालिका सुरू झाल्यापासून टीआरपीच्या यादीतही अव्वल स्थानावर आहे. लवकरच आता खऱ्या अर्थाने ‘प्रेमाची गोष्ट’ सुरू होणार आहे.

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या सुरुवातीपासून आपण सागर व मुक्ता यांच्यात सतत वाद होतं असल्याचं पाहिलं आहे. पण स्वाती व तिचा नवरा कार्तिकवर ओढावलेलं संकट दूर करण्यासाठी मुक्ताने केलेली मदत पाहून सागरचे डोळे उघडले. यामुळे दोघांमध्ये एक विश्वासाचं नातं निर्माण झालं. पण हेच विश्वासाचं नातं लवकरच प्रेमात रुपांतरित होणार आहे.

हेही वाचा – ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत वर्णी लागल्यानंतर सुमीत पुसावळेचं कुटुंबीयांसह सेलिब्रेशन, बायकोने शेअर केली खास पोस्ट

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या पुढील भागात चक्क सागर मुक्ताला प्रपोज करताना दिसणार आहे. याचा व्हिडीओ ‘सीरियल जत्रा’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये, सागर कुटुंबासमोर पोटात दुखत असल्याचं नाटक करताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे कोळी कुटुंब फिरायला जायचा प्लॅन रद्द करायचा असं विचारतात. पण सागर त्यांना जायला सांगतो आणि मुक्ताला थांबवून घेतो. मग मुक्ता सागरची काळजी घेण्यासाठी थांबते. त्यानंतर संपूर्ण घराची सजावट केली जाते. लाइट्स, लाल रंगाचे फुगे आणि मेणबत्ता यांनी सजलेलं घर पाहून मुक्ताला आश्चर्याचा धक्का बसतो. तेव्हा सागर येतो आणि मुक्ताला गुडघ्यावर बसून प्रपोज करतो. आता मुक्ता सागरच्या प्रपोजचा स्वीकार कशी करते? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

हेही वाचा – Video: अनंत-राधिका यांच्या प्री-वेडिंगमध्ये स्वरांची उधळण, अरिजित सिंह ते लकी अलीपर्यंत ‘या’ प्रसिद्ध गायकांनी केलं परफॉर्म

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मुक्ता-सागर यांच्यातील प्रेम पाहण्याची आतुरता प्रेक्षकांना होती आणि अखेर तो क्षण आला आहे. लवकरच दोघांमधील ‘प्रेमाची गोष्ट’ सुरू होणार आहे.