बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘झिम्मा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली जादू केली होती. या चित्रपटानंतर आता लवकरच ‘झिम्मा’ या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या चित्रपटातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

झिम्मा २ या चित्रपटातील मराठी पोरी हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. या गाण्यात ‘इंदू’च्या ७५व्या वाढदिवसाचे खास सेलिब्रेशन आणि संपूर्ण टीमचा स्वॅग पाहायला मिळत आहे. या गाण्यातून सर्व स्त्रियांच्या स्वभावाची खासियत दिसत आहे. तसेच यात कलाकारांची वेशभूषा अधिकच रंगतदार असल्याचे पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा : “चित्रपट गाजला तर नाव मिळते, मालिका चालली तर पैसा आणि नाटक…”, किरण मानेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत

क्षितिज पटवर्धन यांचे बोल लाभलेल्या या गाण्याला अमितराज यांनी संगीत दिले आहे. या गाण्याला आदर्श शिंदे, वैशाली सामंत आणि मुग्धा कऱ्हाडे यांचा आवाज लाभला आहे. यापूर्वी ‘झिम्मा’च्या गाण्यांनी संगीतप्रेमींना भुरळ घातली होतीच, त्यामुळे आता झिम्मा २ मधील गाण्याकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

दरम्यान ‘झिम्मा २’ हा चित्रपट २४ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरु, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आनंद एल. राय आणि क्षिती जोग यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत ढोमेने केले आहे.

आणखी वाचा : ‘झिम्मा २’ चित्रपटात शिवानी सुर्वे आणि सुचित्रा बांदेकर यांच्यात असणार खास कनेक्शन, पोस्ट चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हिंदी सिनेसृष्टीतील नामवंत निर्मिती संस्था ‘कलर यल्लो प्रोडक्शन’ आणि प्रसिद्ध दिग्दर्शक आनंद एल. राय यांनी या चित्रपटाची प्रस्तुती करणार आहेत. चलचित्र मंडळी आणि क्रेझी फ्यु फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे निर्माते आनंद एल. राय आणि क्षिती जोग आहेत आणि विराज गवस, उर्फी काझमी, अजिंक्य ढमाळ हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.