केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या सिनेमाचा अजूनही बोलबोला कायम आहे. प्रदर्शनाला एक महिना उलटूनही सिनेमाची बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई सुरू आहे. खास करून महिला वर्गाचा या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अशातच आता पुरुष वर्गासाठी केदार शिंदे यांनी एक खास ऑफर जाहीर केली आहे. याबाबतची माहिती त्यांनी सोशल मीडियाद्वारे दिली आहे.

हेही वाचा – “तू या जन्मात…”; बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्यानं इमरान हाश्मीची उडवली खिल्ली; म्हणाला…

सहा बहिणींच्या आयुष्यावर आधारित असलेला ‘बाईपण भारी देवा’ सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला आहे. या सिनेमाने ३० दिवसांत ७०.२० कोटींची कमाई केली असून आता सिनेमाची १०० कोटींकडे घोडदौड सुरू आहे. यादरम्यान केदार शिंदे यांनी पुरुष वर्गाने हा सिनेमा अधिक पाहण्यासाठी एक खास ऑफर जाहीर केली आहे. आता ‘बाईपण भारी देवा’ सिनेमा फक्त १०० रुपयांत पाहता येणार आहे.

केदार शिंदे यांनी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत लिहिलं आहे की, “हा सिनेमा “तीने” डोक्यावर घेतला. पण खरंतर मी तो पुरुषांसाठी सादर केला होता. कारण जोवर तो तीचं मन समजून घेत नाही तोवर काहीच वेगळं घडणार नाही. आता मात्र तीचा मान सन्मान राखा. या शुक्रवारपासून ही बंपर ऑफर समस्त पुरुष वर्गाला. चांगला सिनेमा तुमची थिएटरमध्ये वाट पाहतोय.”

हेही वाचा – ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीला पावसाळ्यात खायला आवडतो कर्जतचा ‘हा’ पदार्थ; म्हणाली, “मी आणि माझी मैत्रीण…”

हेही वाचा – समीर वानखेडे यांना क्रांती रेडकर नाही तर ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री आवडते

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, नुकताच ‘बाईपण भारी देवा’ या सिनेमाचा खास शो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासाठी आयोजित करण्यात आला होता. यावेळी सचिन तेंडुलकरने पत्नी अंजलीसह हजेरी लावली होती.