केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण बारी देवा’ या चित्रपटाचा बोलबोला अजूनही सुरू आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन एक महिना पूर्ण झाला असूनही बॉक्स ऑफिसवर अजूनही घोडदौड सुरू आहे. सहा बहिणींच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवरील या चित्रपटाचा जलवा कायम आहे.

नुकतीच केदार शिंदे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करून या चित्रपटाने ३० दिवसांत किती कोटींची कमाई केली, हे जाहीर केलं आहे. ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने ३० दिवसांत ७०.२० कोटींची कमाई केली आहे. याचा फोटो केदार शिंदे यांनी शेअर केला आहे. या फोटोमध्ये चित्रपटाच्या कमाईबरोबर एक जबरदस्त असं वाक्य लिहिलं आहे. “हॉलिवूड-बॉलिवूडच्या गर्दीतला मऱ्हाठमोळा ‘भारी’ आकडा” असं हे वाक्य आहे.

हेही वाचा – आदित्य रॉय कपूरला विमानतळावर लक्षात आलं पॅन्टचं बटण खुलं राहिलंय अन्…; व्हिडीओ झाला व्हायरल

शिवाय हा फोटो पोस्ट करताना केदार शिंदे यांनी लिहिलं आहे की, “आपण न मागता परमेश्वर भरभरून देतो.. तो नेमका कोणत्या रुपात प्रकट होतो? ते कधीच कळत नाही. यावेळी मात्र त्याचं रुप पाहिलं.. रसिक प्रेक्षकांच्या रुपातच परमेश्वर प्रत्येक चित्रपटगृहात अवतरला आणि पदरात दान टाकून गेला.. अजून बराच पल्ला गाठायचा आहे. परमेश्वर साथ सोडणार नाहीच, याची खात्री आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री सिध्दीविनायक महाराज की जय.”

हेही वाचा – ‘लोकमान्य’ मालिकेच्या सेटवर ‘शोले’ चित्रपटाचे झालेले शूटिंग; अभिनेत्याने सांगितला ‘तो’ सीन

हेही वाचा – जेव्हा अभिनेता सिद्धार्थ जाधवला भेटतात बेवडे फॅन; स्वतः किस्सा सांगत म्हणाला, “उत्साहाच्या भरात…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच ‘सैराट’ या चित्रपटानं १०० कोटींचा आकडा पार केला होता. त्यामुळे सध्या ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट ‘सैराट’चा रेकॉर्ड मोडणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.