बहुप्रतीक्षीत व बहुचर्चित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. केदार शिंदे दिग्दर्शित या चित्रपटात महाराष्ट्राचे रत्न असलेले शाहीर साबळे यांचा जीवनप्रवास मोठ्या पडद्यावर उलगडण्यात येणार आहे. या चित्रपटात अंकुश चौधरी शाहीर साबळे यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. तर केदार शिंदेंची लेक सना शिंदे या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.

सनाने नुकतंच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शाहीर साबळे यांच्याबरोबरचा बालपणीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिने “शाहीर साबळे यांच्याबरोबरचं माझं नातं कसं होतं? त्यांच्याबरोबरची एखादी आठवण सांगता येईल का? सगळे मला याबाबत विचारत होते. त्यांच्याबरोबरचा माझा बालपणीचा हा फोटो सापडला. त्यांची नात असल्याचा मला अभिमान आहे,” असं कॅप्शन दिलं आहे.

हेही वाचा>> परिणीती चोप्रा-राघव चड्ढा यांची लगीनघाई, ‘या’ महिन्यात अडकणार विवाहबंधनात?

शाहीर साबळे आणि सना शिंदे यांचं नातं काय?

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांचे शाहीर साबळे आजोबा आहेत. केदार शिंदेंच्या आईचे ते वडील होते. केदार शिंदेंची लेक सनाचे शाहीर साबळे पणजोबा आहेत. सनानने शाहीर साबळे यांच्याबरोबरचा फोटो शेअर करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

हेही वाचा>> ‘ड्रीम गर्ल २’मध्ये उलगडणार सलमान खानच्या अविवाहित असण्याचं गुपित? आयुष्मान खुरानाच्या चित्रपटाचा मजेशीर टीझर प्रदर्शित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट येत्या २८ एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सना शिंदेने शाहीर साबळे यांच्या पहिल्या पत्नी भानुमती यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सना पहिल्यांदाच पडद्यावर दिसणार आहे. याआधी तिने केदार शिंदेंच्या अनेक चित्रपटांत सहाय्यक दिग्दर्शकाची बाजू सांभाळली होती.