‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट ३० जून रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट सध्या चित्रपटगृहात धुमाकूळ घालताना दिसत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत असून या चित्रपटाचे भरभरून कौतुक होत आहे. दिग्दर्शक केदार शिंदे यांना हा चित्रपट तयार करताना अनेक अडचणी आल्या. तर त्यानंतर आता या चित्रपटाला मिळणारे यश पाहून केदार शिंदे यांची लेक सना शिंदे हिने त्यांच्याबद्दल अभिमान व्यक्त केला आहे.

‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचे सगळे शो हाऊसफुल होताना दिसत आहेत. या चित्रपटाने आतापर्यंत आधीच्या मराठी चित्रपटांचे अनेक रेकॉर्ड्स मोडले. पहिल्या दहा दिवसांमध्ये या चित्रपटाने २६.१९ कोटींची कमाई केली आहे. तर सध्या सर्वत्र या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यानिमित्त सना शिंदेने वडिलांबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.

आणखी वाचा : अंकुश चौधरीच्या पत्नीचा ‘बाईपण भारी देवा’तील लूक आहे खूप खास, हातातल्या ब्रेसलेटमागे दडलाय मोठा अर्थ, घ्या जाणून

हा चित्रपट तयार करताना केदार शिंदेंना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. २०१९ साली एकही निर्माता या चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी तयार होत नव्हता. तर आता हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाला उत्तम यश मिळत आहे. यानिमित्त सना शिंदेने केदार शिंदे यांची एक मुलाखत तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत लिहिलं, “जेव्हा तुम्ही पहिल्या दिवसापासून अनेक कठीण प्रसंगांचा सामना करत असता आणि आज तुम्हाला तुमच्या कामाचं चांगलं फळ मिळतं ही खूप अभिमानाची गोष्ट असते. ‘बाईपण भारी देवा’ हा खरोखरच खूप खास चित्रपट आहे. बाबा, तुम्ही जादुई आहात.”

हेही वाचा : ‘बाईपण भारी देवा’ सुपरहिट, पण केदार शिंदे यांची लेक सना कुठे आहे? घ्या जाणून

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सना शिंदे ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचं सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं आहे. तर या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी महत्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत. हा चित्रपट म्हणजे सहा बहिणींची कथा आहे.