केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट २८ एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातून शाहीर साबळे यांच्या जीवनप्रवास मोठ्या पडद्यावर उलगडण्यात आला आहे. ‘महाराष्ट्र शाहीर’बरोबरच केदार शिंदे आणखी एक नवाकोरा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाच्या प्रदर्शनादिवशीच ‘बाईपण भारी देवा’ या त्यांच्या आगामी चित्रपटाचा टीझरही प्रदर्शित करण्यात आला आहे.

‘बाईपण भारी देवा’ चित्रपटातून प्रत्येकीच्या आयुष्यात येणाऱ्या आई, आजी, सासू, काकी, मावशी, ताई, आत्या अशा साऱ्यांच्या भावनांचं चित्रण दाखविण्यात येणार आहे. या चित्रपटात सहा बहिणींची कथा दाखवण्यात आली आहे. काही कारणामुळे एकमेकींपासून विभक्त झालेल्या आणि स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात वेगवेगळ्या समस्यांना सामोऱ्या जाणाऱ्या या सहा बहिणींची कथा म्हणजे सर्वसामान्य आयुष्यातील सुपर वुमनची कथा आहे.

हेही वाचा>> किम कार्दशियनसारखं दिसण्याच्या नादात मॉडेलने गमावला जीव, प्लास्टिक सर्जरीनंतर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचं कथानक महिलांभोवती फिरणारं असलं तरी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक पुरुषालाही हा चित्रपट बरंच काही सांगून जाणार आहे. आपल्या समाजात अशा अनेक स्त्रिया आहेत ज्या महत्त्वपूर्ण भूमिका त्यांच्या-त्यांच्या पातळीवर बजावत असतात पण आपलंच कळत-नकळत त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं. ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटातील अभिनेत्री समाजातील अशाच स्त्रियांचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहेत.

हेही वाचा>> Video : ‘बहरला हा मधुमास’ गाण्याची हिंदी अभिनेत्रीलाही भुरळ, देवोलिना भट्टाचार्जीचा व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर व दीपा चौधरी या अभिनेत्री मुख्य भूमिकेत असणार आहेत. हा चित्रपट येत्या जून महिन्यात चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.