Baipan Bhari Deva Film : केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. गेल्या १८ दिवसांपासून या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाचे संपूर्ण कथानक महिलांच्या दैनंदिन जीवनावर आधारलेले आहे. चित्रपटाला मिळणाऱ्या भरघोस प्रतिसादानंतर अलीकडेच दिग्दर्शक केदार शिंदे यांच्यासह ‘बाईपण भारी…’मधील मुख्य अभिनेत्रींनी एका मुलाखतीला हजेरी लावली. यावेळी केदार शिंदेनी चित्रपटाचे नाव बदल्यावर अनेकजण नाराज झाल्याचे सांगितले. हा प्रसंग नेमका काय आहे? जाणून घेऊयात…

हेही वाचा : “जर हा प्रकल्प फसला…”, छत्रपती संभाजी महाराजांच्या कलाकृतीला माजी खासदाराने दिलेला नकार, अमोल कोल्हेंनी सांगितला अनुभव

दिग्दर्शक केदार शिंदे ‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, “चित्रपटासाठी प्रत्येकाने प्रचंड मेहनत घेतली होती. सध्या ‘बाईपण भारी देवा’ या आमच्या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सुरुवातीला या चित्रपटाचे नाव ‘मंगळागौर’ असे ठेवण्यात आले होते. त्यानंतर आमचा सहनिर्माता अजित भुरेने मला नाव बदल असा सल्ला दिला. ‘मंगळागौर’ नाव ठेवले, तर लोकांना देवीचा चित्रपट आहे असे वाटेल असे त्याचे मत होते.”

हेही वाचा : Video : शोएब इब्राहिमच्या मालिकेच्या सेटवर घुसला बिबट्या, कुत्र्यावर केला हल्ला; व्हिडीओ व्हायरल

केदार शिंदे पुढे म्हणाले, “अजितने मला मुख्य गाण्याचे नाव आणि चित्रपटाचे नाव सारखेच ठेव असे सांगितले. चित्रपटाचे नवे नाव ऐकून खूप जण नाराज झाले. ‘बाईपण भारी देवा’ या नावावर बऱ्याच जणांनी नकार दर्शवला. अगदी या सहा जणींना सुद्धा नाव आवडले नव्हते. वंदू मावशी मला थेट म्हणाली तू नाव बदलले तरंच मी प्रमोशनला येईन. पण, प्रत्येक गोष्ट लिहिलेली असते. आता उलट परिस्थिती निर्माण होऊन प्रत्येकाला ‘बाईपण भारी देवा’ हे नाव खूप कॅची वाटत आहे.”

हेही वाचा : “कमी पैशांत काम, गंभीर आजार, मासिक पाळीत त्रास अन्…”, बॉलीवूड अभिनेत्रीने शेअर केलेली पोस्ट चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आता जेव्हा चित्रपटात ‘बाईपण भारी देवा’ हा ट्रॅक वाजतो, तेव्हा प्रेक्षक फार आनंदी होतात. प्रेक्षक या गाण्यावर चित्रपटगृहांमध्ये नाचतात त्या सगळ्या व्हिडीओ मी सध्या पाहत आहे. या सगळ्या गोष्टी जुळून आल्या… आता चित्रपटाचे नाव सर्वांना एकदम ‘भारी’ वाटत आहे.”, असे केदार शिंदेने सांगितले.