किली पॉल हे सोशल मीडियावरील लोकप्रिय नाव आहे. टांझानियाचा किली पॉल नेहमी त्याच्या रीलमुळे खूप चर्चेत असतो. धाकटी बहीण नीमा पॉलबरोबर तो अनेकदा रील करत असतो. त्याचे इन्स्टाग्रामवर मिलियनमध्ये फॉलोवर्स आहेत. अशा या लोकप्रिय रीलस्टारने नुकतंच ‘बॉइज ४’ चित्रपटातील एका गाण्यावर रील केली आहे; जी चांगलीच चर्चेत आली आहे.

याआधी किली पॉलने अनेक मराठी गाण्यावर रील केली होती. ‘चोरु चोरून’, ‘मधुमास’ या मराठी गाण्यांवर किलीने बहीणबरोबर रील केली होती. या रील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्या होत्या. त्यानंतर आता किलीने ‘बॉइज ४’ चित्रपटातील ‘गाव सुटना’ या गाण्यावर रील केली आहे.

हेही वाचा – Video: “मला नका सांगू…”, पापाराझींवर पुन्हा भडकल्या जया बच्चन, नेटकरी म्हणाले, “भाव नका देऊ”

“काय सांगू राणी…”, असं लिहित किलीने ही रील शेअर केली आहे. या रीलमध्ये तो ‘गाव सुटना’ या गाण्याचे लिप्सिंग करताना दिसत आहे. शिवाय तो गाण्यावर थिरकतानाही पाहायला मिळत आहे. किली पॉलच्या या रीलवर अवधूत गुप्ते, गौरव मोरेसह अनेक मराठी चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा – “तुझं खूप देणं लागतो…” म्हणत कुशल बद्रिकेची बायकोच्या वाढदिवसानिमित्ताने खास पोस्ट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘बॉइज ४’ चित्रपटातील ‘गाव सुटना’ हे गाणं पद्मनाभ गायकवाड याने गायलं आहे. तर अवधूत गुप्ते यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं असून गणेश आत्माराम शिंदे यांनी लिहिल आहे. सोशल मीडियावर ‘गाव सुटना’ हे गाणं अजूनही ट्रेंडमध्ये आहे. युट्यूबवर या गाण्याच्या व्हिडीओला १० मिलियन पेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले असून ७८ हजारांहून लाइक्स मिळाल्या आहेत.