अभिनेत्री क्रांती रेडकर सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ती तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ व्हिडीओ शेअर करत असते. गेले अनेक महिने ती तिच्या आगामी ‘रेनबो’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. आता या शूटिंग दरम्यान तिने शूट केलेला एक ट्रेंडिंग व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे.

क्रांती रेडकर यांनी आतापर्यंत अनेकदा या चित्रपटाचे बिहाइंड द सीन्स व्हिडिओ शेअर करत सेटवर या सगळ्या कलाकारांची काय काय मजा मस्ती सुरू असते हे दाखवलं आहे. हे व्हिडिओ पाहून प्रत्येकाच वेळ तिथे चाहते या कलाकारांच्या बॉन्डिंगचं कौतुक करताना दिसतात. आता त्यांच्या टीममधील काही जणांनी मिळून सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका ट्रेंडिंग म्युझिकवर व्हिडिओ बनवला आहे.

आणखी वाचा : “तो मला एकटीला…” रुपाली भोसलेने ‘त्याच्यासाठी’ केलेली पोस्ट चर्चेत

यावेळी क्रांती, उर्मिला कानिटकर, ऋषी सक्सेना आणि त्यांचे सहकारी दिसत आहे. उर्मिला कानिटकर, ऋषी सक्सेना आणि त्यांचा एक सहकारी एका बाजूला, तर क्रांती आणि तिचे दोन सहकारी दुसऱ्या बाजूला उभे राहून सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका म्युझिकवर नाचताना दिसत आहेत.

हेही वाचा : “ब्रेकअप झालंय? अबोला धरलाय? मग…”; उर्मिला कानिटकरने शेअर केला व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उर्मिला आणि ऋषी यांच्या डोक्यावर लिहिलं आहे की “लंच ब्रेकनंतर हा सीन.” तर त्यांच्यासमोर उभ्या असलेल्या क्रांतीच्या डोक्यावर लिहिलं आहे, “या सीननंतर लंच ब्रेक.” हा त्यांचा गमतीशीर व्हिडिओ पोस्ट करत क्रांतीने कॅप्शनमध्ये लिहिलं, “याआधी माझ्या कोणत्याही चित्रपटाच्या सेटवर मी इतकी मजा केली नव्हती.” त्यांचा हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वायरल होत असून तिचे चाहते या व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया देत हा त्यांचा अंदाज आवडल्याचं सांगत आहेत.