ललित प्रभाकर हा मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. छोट्या पडद्यावरुन अभिनयातील करिअरची सुरुवात केलेल्या ललितने अनेक मालिका व चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. लवकरच ललित ‘टर्री’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

‘टर्री’ चित्रपटात ललित प्रभाकरसह अभिनेत्री गौरी नलावडेही मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटातील ‘क्षण हळवा’ हे गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. या गाण्यात ललित व गौरीचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. लिपलॉक, किसिंगसह अनेक रोमँचिक सीन्सची झलकही या गाण्यात दिसली आहे. ललित व गौरीचा रोमान्स असलेलं हे गाणं ‘O.Y.S. Originals’ या युट्यूब चॅनेलवरुन प्रदर्शित करण्यात आलं आहे.

हेही वाचा>> नाना पाटेकरांवर जडलेलं मनीषा कोईरालाचं प्रेम; पण अभिनेत्याला दुसऱ्याच अभिनेत्रीबरोबर रुममध्ये पाहिलं अन्…

हेही वाचा>> ‘पठाण’च्या बॉक्स ऑफिस कमाईवर दिग्दर्शकाची पहिली प्रतिक्रिया, सिद्धार्थ आनंद म्हणाले “माझ्यासाठी आकडे…”

‘क्षण हळवा’ हे गाणं गुरू ठाकूर यांनी लिहिलं आहे. तर रोहित राऊत व शरयू दाते यांनी हे गाणं सुरेल आवाजात रेकॉर्ड केलं आहे. ‘क्षण हळवा’ हे ‘टर्री’ चित्रपटातील दुसरं गाणं आहे. याआधी ललितचं चित्रपटातील ‘लाव फोटो माझा’ हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं होतं. या गाण्याला प्रेक्षकांनी पसंती दर्शविली होती.

हेही वाचा>> Video: स्वत:च्याच लग्नात हटके ड्रेस परिधान केल्यामुळे मसाबा गुप्ता ट्रोल; नेटकरी म्हणाले “फॅशन डिझायनर असूनही…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘टर्री’ या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश काळे यांनी केलं आहे. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला असून एक अनोखी लव्हस्टोरी पाहायला मिळणार आहे. येत्या १७ फ्रेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.