scorecardresearch

Video: स्वत:च्याच लग्नात हटके ड्रेस परिधान केल्यामुळे मसाबा गुप्ता ट्रोल; नेटकरी म्हणाले “फॅशन डिझायनर असूनही…”

मसाबा गुप्ताने अभिनेता सत्यदीप मिश्राशी लग्नगाठ बांधत दुसऱ्यांदा संसार थाटला आहे.

masaba gupta troll
मसाबा गुप्ता ट्रोल. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

बॉलिवूडमधील प्रसिद्ध फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता शुक्रवारी(२७ जानेवारी) दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकली. मसाबा ही सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता व विवियन रिचर्ड्स यांची मुलगी आहे. मसाबाने अभिनेता सत्यदीप मिश्राशी लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नातील फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

लग्नानंतर मसाबा व सत्यजीतने समाजमाध्यमातील प्रतिनिधींना मिठाई वाटली. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी मसाबाने काळ्या व निळ्या रंगाच्या कपड्यांत हटके पेहराव केला होता. नववधूचा हा पेहराव पाहून नेटकरी गोंधळात पडले आहे. मसाबाच्या हटके कपड्यांवरुन नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.

हेही वाचा>> शाहरुख खानच्या ‘पठाण’चा ‘गांधी-गोडसे’ला फटाका; सलग दोन दिवस चित्रपटाची लाखोंमध्ये कमाई

हेही वाचा>> “मी, माझा पती, मुलीचे वडील अन्…” मसाबाच्या लग्नानंतर ‘तो’ फोटो शेअर करत नीना गुप्ता यांनी दिलेलं कॅप्शन चर्चेत

‘विरल भय्यानी’ या इन्स्टाग्राम पेजवरुन मसाबाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर कमेंट करत नेटकरी मसाबाला ट्रोल करत आहेत. “हिचे कपडे मला काही कळतच नाहीये”, अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसऱ्याने “फॅशन डिझायनर असूनही स्वत:साठी चांगले कपडे डिझाइन नाही करू शकली”, असं कमेंटमध्ये म्हटलं आहे. “हिने काय घातलं आहे”, अशी कमेंटही एकाने केली आहे.

हेही वाचा>> ‘पठाण’च्या बॉक्स ऑफिस कमाईवर दिग्दर्शकाची पहिली प्रतिक्रिया, सिद्धार्थ आनंद म्हणाले “माझ्यासाठी आकडे…”

दरम्यान, मसाबा व सत्यदीप गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना रिलेशनशिपमध्ये होते. मसाबाचं पहिलं लग्न मधू मंटेनाशी झालं होतं. पण काही वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर आता सत्यदीपबरोबर संसार थाटत मसाबाने नव्या इनिंगला सुरुवात केली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 11:28 IST