मराठी अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरचा ‘फुलराणी’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटातील गाणी, ट्रेलर सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर ही प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहे. नुकतंच या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री वनिता खरातने खास पोस्ट शेअर केली आहे.

प्रियदर्शनीचा ‘फुलराणी’ हा चित्रपट बुधवारी (२२ मार्च) प्रदर्शित झाला. या निमित्ताने सिनेसृष्टीतील व्यक्तींसाठी खास प्रिमिअरचे आयोजन करण्यात आले होते. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील अनेक कलाकारांनी यावेळी उपस्थिती दर्शवली. त्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत चित्रपटाबद्दल सांगितले.
आणखी वाचा : “मी प्रियदर्शनीला ओळखत नव्हतो, ती हास्यजत्रेत…” सुबोध भावेचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत

अभिनेत्री वनिता खरातने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने प्रियदर्शनीबरोबरचा एक गोड फोटो शेअर केला आहे. त्याला कॅप्शन देताना तिने तिचे कोतुक केले आहे.

वनिता खरातची पोस्ट

“प्रिया,
काय बोलू, काय लिहू तुझ्याविषयी काहीच कळत नाहीये. उर आनंदाने आणि अभिमानाने भरून आलाय. तू सोडून दुसरी “फुलराणी” इमॅजिनच होत नाहीये एवढं भारी आणि कमाललल काम केलं आहेस तू. तुझ्या छोट्या छोट्या रिएक्शन तर आहाहा. तुला एवढ्या मोठ्या पडद्यावर बघून मला काय वाटत होतं हे मी तुला शब्दात नाही सांगू शकत प्रिया.तेरी तो निकल पड़ी .आता मागे वळून नको बघुस. प्रत्येक क्षण enjoy कर. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.

प्रियाच्या बहारदार कामासाठी “फुलराणी” हा चित्रपट चित्रपट गृहात जाऊन नक्की बघा. आज पासून सर्वत्र प्रदर्शित झाला आहे”, असे वनिता खरातने म्हटले आहे.

आणखी वाचा : “शेवटचा हॅशटॅग महत्त्वाचा…” ओंकार राऊतच्या ‘त्या’ पोस्टवर प्रियदर्शनी इंदलकरची कमेंट चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान ‘फुलराणी’ या चित्रपटात सुबोध भावे विक्रम ही भूमिका साकारताना दिसणार आहे. तर सुशांत शेलार सौरभ ही व्यक्तिरेखा साकारत आहे. बुधवारी २२ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित झाला.