मराठीतला सगळ्यांचा आवडता, लाडका रोमॅंटिक हीरो अंकुश चौधरीला आपण वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहिलं आहे. आता अंकुश चौधरी शाहीर साबळे यांच्या जीवनावर बेटलेल्या चित्रपटात त्यांची भूमिका साकारणार आहे. केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटात अंकुश चौधरी प्रमुख भूमिकेत आहे. या चित्रपटाचं ट्रेलर प्रदर्शित झाला असून गाणीदेखील लोकांच्या ओठांवर आली आहेत. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत.

यानिमित्ताने नुकतंच चित्रपटाच्या टीमने एकत्र येऊन शाहीर साबळे यांच्या आठवणींना उजाळा दिला. ‘एव्हरेस्ट मराठी’च्या युट्यूब चॅनलवर अभिनेत्री प्राजक्ता माळीबरोबर अंकुश चौधरी, केदार शिंदे, गीतकार गुरु ठाकूर आणि या चित्रपटाचे संगीतकार अजय-अतुल या कलाकारांनी धमाल गप्पा मारल्या. या मुलाखतीमध्ये चित्रपटादरम्यानचे विविध किस्से आणि शाहीर साबळे यांच्या अनेक आठवणी त्यांनी सांगितला.

आणखी वाचा : Apple चे सीईओ टीम कुक यांची धकधक गर्ल माधुरी दीक्षितसह खास डेट; मुंबईच्या वडापावचा घेतला आस्वाद

याच मुलाखतीमध्ये केदार शिंदे यांनी अंकुश चौधरीच्या गाण्याबद्दल खुलासा केला. अंकुशच्या गायकीबद्दल बोलताना केदार शिंदे म्हणाले, “चित्रपटाच्या शूटिंगसाठी मी अजय-अतुलकडे गाण्यासाठी तकादा लावला होता, आम्हाला योग्य आवाजच सापडत नव्हता. शिवाय मी माझ्या चित्रपटात उत्तम अभिनेता अंकुश चौधरीला घेतलं होतं, तो उत्तम नट आहेच पण तो अत्यंत बेसुर गायकही आहे. त्यामुळे मला गाणी हातात पडणं भाग होतं. अंकुश नेमका बेसुरा कसा याबद्दल तोच जास्त माहिती देऊ शकेल.”

आणखी वाचा : ब्रेसलेटबरोबर आता ‘हे’ घडयाळ ठरतंय सलमानसाठी लकी? भाईजानच्या घड्याळाची किंमत ऐकून हैराण व्हाल

केदार शिंदे यांच्या या म्हणण्यावर एकच हशा पिकला आणि अंकुश चौधरीही मनापासून हसला. त्यानंतर त्याने याबद्दलचा एक किस्सा सांगितला. “महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमात सहभागी होईपर्यंत मला वाटायचं मी फारच उत्तम गातो, पण या कार्यक्रमादरम्यान केदार शिंदेला काही शिबिरांमध्ये हे कळून चुकलं होतं की मी खूप बेसुर आहे. त्यामुळे त्याने मला सांगितलेलं की तू फक्त अभिनय कर गाऊ नकोस. जेव्हा कार्यक्रम सुरू असायचा तेव्हा मंचावर शाहीर पुढे उभे राहून ‘जय जय महाराष्ट्र माझा’ गायचे आणि आम्ही सगळे मागे कोरस म्हणून सदरा लेंगा, टोपी घालून गायला उभे असायचो. त्यावेळी बऱ्याचदा मी गायला सुरुवात केली की शाहीर साबळे मागे वळून त्या १०-१५ लोकांमध्ये माझ्याकडेच बघून कटाक्ष टाकायचे आणि केदार माझ्या बाजूला असायचा तो मला गाऊ नकोस म्हणून खुणवायचा. तेव्हापासून आजतागयात मला बेसुर आणि सुरेल यातला फरक समजलेला नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अर्थात ही सगळी मजेशीर गंमत सांगून झाल्यावर केदार शिंदे यांनी अंकुश चौधरीचं कौतुकही केलं. एका गायकाची भूमिका साकारताना अंकुश चौधरीला नेमकी कशी तयारी करावी लागली हेसुद्धा अंकुशने या मुलाखतीमध्ये सांगितलं. या चित्रपटात अंकुश चौधरी, सना शिंदे यांच्याबरोबरच अभिनेत्री अश्विनी महांगडेदेखील महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यात लता मंगेशकरांची भूमिका साकारत आहे. तर या चित्रपटाच्या संगीताची धुरा अजय-अतुल यांनी सांभाळली आहे. २८ एप्रिल २०२३ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.