‘चौकट राजा’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘धूमधडाका’, ‘आम्ही सातपुते’ ते नुकताच प्रदर्शित झालेला ‘वेड’ अशा असंख्य चित्रपटांमधून ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. कलाक्षेत्रातील त्यांच्या या भरीव योगदानासाठी २०२३ या वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला आहे.

मराठीसह बॉलीवूडमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. अशोक सराफ यांना मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर सध्या सर्व स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांसह कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेने देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एक जुना व्हिडीओ शेअर करत अशोक सराफ यांना शुभेच्छा दिल्या आहेत. राज ठाकरे या व्हिडीओमध्ये अशोक सराफ यांचं कौतुक करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : हेमा मालिनींच्या लेकीचा ११ वर्षांचा संसार मोडला; ईशा देओल – भरत तख्तानी झाले विभक्त

गौरवने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये राज ठाकरे म्हणतात, “या व्यक्तीला आपण लहानपणापासून पाहत आलो आहोत. मी त्यांचे पुष्कळ सिनेमे, नाटकं पाहिली आहेत. मला त्यांचं ‘डार्लिंग डार्लिंग’ हे नाटक आजही आठवतं. समोर कोणीही असूदे अशोक सराफ यांना कधीच कोणाचा फरक पडला नाही… असे हे एकमेव अभिनेते आहेत. त्यांच्या प्रत्येक चित्रपटामध्ये ते स्वत:चा काहीतरी ठसा उमटवतात ही साधी गोष्ट नाहीये.”

हेही वाचा : ‘झी मराठी’वर १२ फेब्रुवारीपासून होणार मोठा बदल! ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिका आता नवीन वेळेत, जाणून घ्या…

“त्यांचं व्हॅक्यूम क्लिनर हे नाटक पाहण्यासाठी मी गेलो होतो. त्यांची ज्या क्षणी एन्ट्री झाली…त्या क्षणाला सर्वत्र टाळ्यांचा कडकडाट झाला. ५० ते ६० वर्षे स्वत:बद्दलचं कुतूहल जागृत ठेवणं ही सोपी गोष्ट नाही. अशोक सराफ ही व्यक्ती आज जर दक्षिणेमध्ये असती, तर आज ते मुख्यमंत्री असते. चाळीस फुटांच्या त्यांच्या कटआऊटवर दुग्धाभिषेक करण्यात आला असता. हा दागिना फक्त सराफांच्या घरातच मिळू शकतो.” असं राज ठाकरेंनी अशोक सराफ यांच्याबद्दल सांगितलं.

View this post on Instagram

A post shared by Raj Thackeray FC (@rajthackerayfanclub)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
gaurav more
गौरव मोरेची पोस्ट

दरम्यान, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेने राज ठाकरेंचं हे भाषण त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत यावर “वाह…” असं कॅप्शन लिहिलं आहे. सध्या संपूर्ण मराठी कलाविश्वातून अशोक सराफ यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.