‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांची मनं जिंकणारी लॉली म्हणजे नम्रता संभेराव खूप चर्चेत असते. या कार्यक्रमाव्यतिरिक्त आता नम्रता वेगवेगळ्या चित्रपट, नाटकांमधून विविधांगी भूमिका साकारताना दिसत आहे. नम्रता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. रील व्हिडीओ, फोटो शेअर करून अभिनेत्री नेहमी चाहत्यांच्या संपर्कात असते. यामाध्यमातून ती सतत आपल्या चाहत्यांना हसवण्याचा प्रयत्न करत असते. नुकताच तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे; ज्यामुळे तिच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे.

नम्रता संभेरावने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये ती अभिनेते संजय नार्वेकर यांच्याबरोबर पाहायला मिळत आहे. संजय नार्वेकर यांच्या हातात खोटं धनुष्यबाण दिसत आहे. तर नम्रता साडीत पाहायला मिळत आहे. यावेळी ती संजय नार्वेकरांकडे आश्चर्याने बघताना दिसत आहे.

Namrata Sambherao And Sanjay Narvekar (2)
नम्रता संभेरावची इन्स्टाग्राम स्टोरी

२००६मध्ये प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटातील नम्रता आणि संजय नार्वेकरांचा हा फोटो आहे. विजय पाटकर यांचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात तगड्या कलाकारांची फौज पाहायला मिळाली होती. अभिनेते संजय नार्वेकर यांच्यासह विजय चव्हाण, दीपाली सय्यद, विजय कदम, प्रदीप पटवर्धन, किशोरी अंबिये, जॉनी लिव्हर, श्रीरंग गोडबोले, पूर्णिमा अहिरे, रसिका जोशी, दीपक शिर्के, निशा परुळेकर, सुनील तावडे, अरुण नलावडे, रमेश वाणी असे अनेक कलाकार मंडळी या चित्रपटात झळकले होते.

या चित्रपटात एक झपाटलेली चाळ असते. या चाळीत राजाराम नावाचा गृहस्थ असतो. त्याच्या आयुष्यात बरीच उलथापालथ होते. एक लोभी बिल्डर त्यांची झपाटलेली चाळ पुनर्विकासासाठी घेण्याचा प्रयत्न करतो. पण राजारामकडे पूर्वाजांचा जादूचा चष्मा असतो. हा चष्मा घालून जे पुस्तक वाचेल त्या पुस्तकातील कोणत्याही पात्रात रुपांतरित होत असतो. यावरून ओळखचं असेल हा चित्रपट कोणता असेल?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नम्रता आणि संजय नार्वेकराचा हा फोटो ‘चश्मेबहाद्दर’ या चित्रपटातील आहे. अजूनही हा चित्रपट तितक्याच आवडीने आज पाहिला जातो. या चित्रपटातील गाणी तेव्हा खूप लोकप्रिय झाली होती. काल्पनिक कथेवर आधारित असलेला ‘चश्मेबहाद्दर’ हा कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांना खळखळून हसवतो.