‘जुनं फर्निचर’ हा चित्रपट येत्या २६ एप्रिल रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टिझर लाँच सोहळा पार पडला. टीझरमधील महेश मांजरेकर यांच्या करारी व्यक्तिरेखेची झलक सर्वांनीच पाहिली. आता या चित्रपटातील इतर कलाकारांची नावं व त्यांचे लूक समोर आले आहेत. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे.

या पोस्टरमध्ये महेश मांजरेकर यांच्यासोबत मेधा मांजरेकर, उपेंद्र लिमये, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर आणि सचिन खेडेकर दिसत आहेत. पोस्टरमध्ये न्यायालय, न्यायधीश आणि काही कागदपत्रे दिसत आहेत, ज्यावर न्याय, हक्क, कायदा लिहिलेले आहे. त्यामुळे आता ही कोणती लढाई लढली जाणार आहे, याचे उत्तर प्रेक्षकांना चित्रपट पाहूनच मिळणार आहे.

sonali khare clarifies age difference between husband and her
“आमच्यात २७ वर्षांचं अंतर नाही”, सोनाली खरेने थेट सांगितली नवऱ्यासह तिची जन्मतारीख; म्हणाली, “बायका त्यांचं वय…”
Aarti Singh To Marry Boyfriend Deepak Chauhan
प्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी करतेय अरेंज मॅरेज, नवी मुंबईचा आहे होणारा पती; म्हणाली, “माझ्या आयुष्यात…”
Narayani Shastri family
पाच बहिणी अन् एक भाऊ, आई महाराष्ट्रीय तर वडील…; प्रसिद्ध अभिनेत्रीने कुटुंबाबद्दल दिली माहिती
Mumbai Women Buys 19 Flats Worth 118 Crores In Malbar Hill
“बंगल्यासमोर बिल्डिंग बांधली, समुद्र कसा बघू?”, म्हणत दक्षिण मुंबईत १९ फ्लॅट्स विकत घेणारी ‘ती’ आहे तरी कोण?

Video: गर्दीतून ‘नमस्कार वहिनी’ अशी हाक येताच आलिया भट्टने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत, पाहा व्हिडीओ

jun furniture poster
‘जुनं फर्निचर’ चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित (फोटो – पीआर)

या चित्रपटात समीर धर्माधिकरी, डॉ. गिरीश ओक, विजय निकम, संतोष मिजगर, अलका परब, शरद पोंक्षे यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. याव्यतिरिक्त या चित्रपटात ओंकार भोजने, शिवाजी साटम यांचीही झलक पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या चित्रपटात अनेक बड्या कलाकारांना एकत्र पाहाण्याची संधी मिळणार आहे. या मल्टीस्टारर चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन महेश वामन मांजरेकर यांनी केले असून यतिन जाधव ‘जुनं फर्निचर’चे निर्माते आहेत.

“एक माणूस समोरून आला अन्…”, दादरमध्ये प्रिया बापटबरोबर घडला होता धक्कादायक प्रसंग

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर म्हणतात, ”जुन्या फर्निचरमध्ये किती ताकद असते, हे दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. एका ज्येष्ठ नागरिकाचा लढा यात दाखवण्यात आला आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक अशा प्रकारच्या परिस्थितीला सामोरे जात असतील, परंतु ही प्रकरणे समोर येत नाहीत. मी म्हणेन प्रत्येक तरूणाने आपल्या पालकांसोबत हा चित्रपट पाहावा, जेणे करून त्यांचा दृष्टिकोन बदलेल.”