‘वाट बघतोय रिक्षावाला’ या गाण्यामुळे अभिनेत्री मानसी नाईक घराघरांत लोकप्रिय झाली. तिच्या नृत्यशैलीबरोबरच अभिनयाचं देखील सर्वत्र कौतुक केलं जातं. गेल्या वर्षभरापासून मानसी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होती. मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा यांचं लग्न १९ जानेवारी २०२१ ला झालं होतं. पण, त्यानंतर वर्षभरातच मानसीने पतीपासून विभक्त होत असल्याची माहिती तिच्या चाहत्यांना दिली होती. आता अधिकृतपणे तिच्या घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. याबाबत युट्यूब व्हिडीओ शेअर करत तिने माहिती दिली आहे.

मानसी व प्रदीप आता अधिकृतरित्या वेगळे झाले असून याबाबत दोघांनीही त्यांच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे माहिती दिली आहे. अभिनेत्रीने या संपूर्ण प्रवासाबद्दल सविस्तरपणे तिच्या युट्यूब व्हिडीओमध्ये सांगितलं आहे.

हेही वाचा : “वीर सावरकर म्हणजे…” मराठमोळ्या अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत; म्हणाली, “दोन वर्षांपूर्वी…”

मानसी नाईक या व्हिडीओमध्ये सांगते, “मनोरंजन विश्वात कार्यरत असणाऱ्या कोणत्याही कलाकाराचं आयुष्य हे प्रायव्हेट नसतं. गेल्या वर्षभरात मी अनेक मुलाखतींमध्ये माझं मन मोकळं केलं आहे. सगळ्या मुलाखती, लाइव्ह सेशनमध्ये मी ताठ मानेनं माझं मत मांडलंय. मी कधीच खोटं बोलत नाही. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेला माझा घटस्फोटाचा प्रवास आता संपलेला आहे. अधिकृतरित्या मी आता वेगळी झालेली आहे.”

मानसी पुढे म्हणाली, “या संपूर्ण प्रवासात मी अजिबात हरले नाही. उलट मी आणखी जिद्दीने यापुढचा प्रवास करणार आहे. सगळ्यांचा कलाकारांकडे पाहण्याचा दृष्टीकोन सामान्य माणसांपेक्षा फार वेगळा असतो. पण, आम्ही सुद्धा माणूस असतो हे कधीही विसरू नका. आमच्याकडून देखील चुका होता पण, या चुका सुधारता येऊ शकतात. भूतकाळातील सर्व गोष्टींना पूर्णविराम देत मी एक नवीन प्रवास आनंदाने सुरू करत आहे.”

हेही वाचा : सिद्धार्थ चांदेकरला अभिनेता नाही तर ‘या’ क्षेत्रात करायचे होते करिअर; म्हणाला, “आमच्या घरात…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आज हक्काने तुम्हा सर्वांचे मी आभार मानते. या प्रवासात तुम्ही मला नेहमी साथ दिली. आता पुन्हा एकदा मी नव्याने जगायला सुरुवात करतेय…त्यामुळे तुमची साथ आणि तुमचा प्रतिसाद माझ्यासाठी खूप मोलाचा आहे.” असं मानसी नाईकने सांगितलं.