मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री मानसी नाईक तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. ‘बाई वाड्यावर या’, ‘बघतोय रिक्षावाला’ गाण्यांमुळे प्रसिद्धी मिळवलेली मानसी तिच्या दिलखेचक अदांनी चाहत्यांनी घायाळ करते. घटस्फोटाच्या चर्चांनंतर मानसी व तिचा नवरा प्रदीप खरेरा यांची सोशल मीडियावर जुगलबंदी सुरू आहे.

प्रदीपने नुकतंच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक रील व्हिडीओ शेअर केला आहे. एका पंजाबी गाण्यावर त्याने रील बनवली आहे. “तुमको प्यार करते है”, असं कॅप्शन त्याने व्हिडीओला दिलं आहे.  या रील व्हिडीओमध्ये प्रदीप हातात कॉफीचा मग घेऊन गाणं बोलताना दिसत आहे. “जुर्म सिर्फ इतना है, तुमको प्यार करते है”, असं तो म्हणत आहे. त्याच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्सही केल्या आहेत.

हेही वाचा>> “तिच्यामुळे शीझान खानचं करिअरही…”, तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणावर प्रसिद्ध अभिनेत्याचं ट्वीट

हेही वाचा>>‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम दत्तू मोरे हिंदी जाहिरातीत झळकला; पोस्ट शेअर करत म्हणाला…

प्रदीपच्या या व्हिडीओचा संबंध चाहत्यांनी मानसी नाईकशी जोडला आहे. एकाने कमेंट करत “मानसीला सोडू नकोस”, असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने “मानसी नाईकची आठवण येते आहे का?”. अशी कमेंट केली आहे.

हेही पाहा>> Photos: तुनिषा शर्माने शूटिंगदरम्यानच केली आत्महत्या; मालिकेच्या सेटवर नेमकं काय घडलं?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रदीप एक बॉक्सर असून तो मॉडेलिंग क्षेत्रातही करिअर करत आहे. जानेवारी २०२१ मध्ये प्रदीप व मानसीने विवाहबद्ध होत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. सुरुवातीला त्यांच्या सुखाचा संसार सुरू होता. परंतु, नंतर अचानक संसारात वादळ आल्याने त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे.