मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री मानसी नाईक गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. मानसी पती प्रदीप खरेरापासून घटस्फोट घेत वेगळी होणार आहे. घटस्फोट घेणार असल्याचं जाहीर केल्यानंतर मानसी व प्रदीपच्या सोशल मीडियावरील रील्सची बरीच चर्चा रंगत आहे.

काही दिवसांपूर्वी प्रदीप खरेराने रडतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. त्यावर मानसी नाईकने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून प्रदीपला उत्तर दिलं होतं. त्यानंतर आता प्रदीपने त्याच्या सोशल मीडियावरुन आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याच्याबरोबर एक मुलगीही दिसत आहे. घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान मुलीबरोबर व्हिडीओ शेअर केल्याने प्रदीपने सगळ्यांचच लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा>> प्रथमेश परब लवकरच अडकणार विवाहबंधनात? सोशल मीडियावरच दिलं लग्नाचं आमंत्रण

प्रदीप खरेराने या पोस्टला “आग लगेगी” असं कॅप्शन दिलं आहे. त्याच्या या व्हिडीओचा संबंध मानसी नाईकशी जोडला जात आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी तशा कमेंटही केल्या आहेत. प्रदीपच्या या पोस्टची बरीच चर्चा रंगली आहे.

हेही वाचा>> Video: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सेटवर शिवाली परबसह थिरकला रणवीर सिंग, अभिनेत्री व्हिडीओ शेअर करत म्हणते…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘बाई वाड्यावर या’, ‘गुलाबी नोट’ या गाण्यांमुळे प्रसिद्धी मिळविलेल्या मानसीने पेशाने बॉक्सर असलेल्या प्रदीपशी जानेवारी २०२१मध्ये लग्नगाठ बांधली होती. सुरवातीला त्यांचा सुखाचा संसार सुरू होता. परंतु, संसारात वादळ आल्याने त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.