scorecardresearch

Premium

“मुख्यमंत्र्यांंचं प्रमोशन…”, ‘धर्मवीर २’च्या पोस्टरवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स, म्हणाले “दिघेंची पुण्याई…”

‘धर्मवीर २’च्या पोस्टरवर नेटकऱ्यांच्या कमेंटस, म्हणाले “गेलेली इज्जत..”

dharmveer 2 poster comment
'धर्मवीर २'च्या पोस्टरवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स

ठाण्यातील शिवसेनेचे आधारस्तंभ आनंद दिघे यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट चांगलाच लोकप्रिय ठरला. आता लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. धर्मवीर २ या चित्रपटाचे पहिलं पोस्टरही प्रदर्शित झाले. यावर आता नेटकरी कमेंट करताना दिसत आहेत.

अभिनेता प्रसाद ओकने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. सांगण्यास अतिशय आनंद होत आहे की, अनेक दिवसांपासून सुरु असलेली चर्चा, आता प्रत्यक्षात उतरणार… “धर्मवीर २” मधून उलगडणार ‘साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट…’, असे कॅप्शन प्रसाद ओकने या फोटोला दिले आहे.
आणखी वाचा : ‘धर्मवीर २’च्या अधिकृत घोषणेनंतर प्रसाद ओकची पोस्ट, म्हणाला “अनेक दिवसांपासून…”

genelia deshmukh gets surrounded with little kids on the street
Video : जिनिलीया त्यांच्याजवळ गेली अन्…; देशमुखांच्या सुनेच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष, सर्वत्र होतंय कौतुक
uddhav thackeray kiran samant
उदय सामंतांच्या बंधुंच्या व्हॉट्सअ‍ॅप डीपीला उद्धव ठाकरेंची ‘मशाल’ ठेवल्यानं खळबळ, नेमकं काय घडलं?
pm modi compared urjit patel with snake
“मोदींनी RBI गव्हर्नर उर्जित पटेल यांची तुलना सापाशी केली”, अर्थखात्याच्या माजी सचिवांचा खळबळजनक दावा!
Chandrasekhar Bawankule question
अजित पवारांना ४४० व्होल्टचा करंट द्या…प्रश्नावर…बावनकुळे न बोलताच निघून गेले!

प्रसाद ओकच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी यावर कमेंट करत प्रसादला सल्ला दिला आहे. या पोस्टखाली एका नेटकऱ्याने “आनंद दिघे यांचच कर्तृत्व दाखवा म्हणजे झालं, नाहीतर ऐन इलेक्शनला हा चित्रपट कमी आणि दिघेंच्या नावावर कुणाच तरी पेड प्रमोशन वाटायला नको, दिघे यांची पुण्याई कुणा दुसऱ्याच्या अति महत्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी वापरली जाऊ नये एवढंच”, अशी कमेंट केली आहे.

तर एकाने “दिघे साहेबांच्या नावावर sympathy मिळवून vote मागण्या साठी शिंदे पुन्हा सज्ज”, असे म्हटले आहे. “गेलेली इज्जत परत मिळवण्यासाठी केविलवाणा प्रयत्न”, अशी कमेंट एकाने केली आहे. तर एकाने “पक्ष कसा फोडला आणि गदारी कशी केली हे पण दाखवा”, असे म्हटले आहे. “प्रसाद जी, हा चित्रपट धर्मवीरच्या कथेवर आधारित असावा, सध्याच्या मुख्यमंत्र्यांचं प्रमोशन नको”, अशी कमेंट एकाने केली आहे. तसेच एकाने “नक्की सिनेमा दिघे साहेब आणि त्यांनी केलेल्या सर्व कामांवर आहे का? कारण दिघे साहेबांच नाव घेऊन खूप जण आपले विचार आणि आचार विकत आहेत”, असे म्हटले आहे.

prasad oak comment (1)
प्रसाद ओकच्या फोटोवरील कमेंट

आणखी वाचा : “साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट उलगडणार…”, प्रवीण तरडेंकडून ‘धर्मवीर २’ची अधिकृत घोषणा, पहिलं पोस्टर समोर

दरम्यान ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ २ या चित्रपटाचे पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आले. त्यावर साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट…’ अशी टॅगलाईन पाहायला मिळत आहे. प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ यात प्रसाद ओकने आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती. त्याची ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली होती.

‘धर्मवीर २’ या चित्रपटातही प्रसाद ओक हा आनंद दिघेंची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट हिंदुत्त्वावर भाष्य करणारा असल्याचं बोललं जात आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रविण तरडे करणार आहेत. तर मंगेश देसाई हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mangesh desai announces dharmaveer 2 sequel on biopic of late shiv sena leader anand dighe poster cm eknath shinde comment nrp

First published on: 09-08-2023 at 17:16 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×