प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मानसी नाईक अभिनयासह नृत्यातही पारंगत आहे. ‘जबरदस्त’ या चित्रपटातून मानसीने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. तर ‘बाई वाड्यावर या’, ‘मस्त चाललंय आमचं’, ‘रिक्षावाला’ या गाण्यांनी तिने प्रेक्षकांची मनं जिंकली. विशेष म्हणजे मराठी इंडस्ट्रीत तिला ऐश्वर्या राय म्हणून ओळखलं जातं. मराठी चित्रपटासृष्टीत येण्याआधीच तिला ऐश्वर्या राय म्हटलं जात होतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मानसीने यामागचं कारण स्पष्ट केलं.

‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत मानसीने याबाबतचा किस्सा सांगितला, ती म्हणाली, “मी जेव्हा कॉलेजला होते तेव्हा ‘देवदास’ चित्रपट आला होता. मला पेन, पेन्सिल गोळा करायची फार आवड होती. कॉलेजला जाताना जर मी कधी पंजाबी ड्रेस घालून गेले तर मी माझ्या केसांचा बन बांधून त्या बनमध्ये पेन अडकवायचे. माझे काही सीनियर मित्र होते जे मला थांबवायचे आणि प्रॅक्टिकलसाठी केमिस्ट्री लॅबमध्ये जाण्याआधी ‘देवदास’चा आयकॉनिक सीन करायला लावायचे. तो क्षण माझ्यासाठी खूप आनंदाचा होता. मला ‘फर्ग्यूसन की ऐश्वर्या राय’ असंही म्हटलं जायचं. माझी ऐश्वर्या राय अशी ओळख कॉलेजला असल्यापासूनचं निर्माण झाली.”

हेही वाचा… यामी गौतमनंतर रिचा चड्ढानेही दिली गुडन्यूज, अली फजलने शेअर केली खास पोस्ट, म्हणाला…

हेही वाचा… आलिशान बंगला सोडला, लक्झरी गाडी विकली, चित्रपटसृष्टीपासूनही दूर; अभिनेता इम्रान खान सध्या करतोय तरी काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मानसी नाईक ही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती आपले फोटो, व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. मानसीच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सांगायचं झाल्यास ती मध्यंतरी तिच्या घटस्फोटामुळे चर्चेत होती. जानेवारी २०२१ मध्ये मानसीने बॉक्सर प्रदीप खरेराशी लग्नगाठ बांधली होती. पण दीड वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला.