अभिनय व डान्ससाठी ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे मानसी नाईक (Mansi Naik) होय. ‘जबरदस्त’, ‘जलसा’, अशा चित्रपटांत अभिनेत्रीने काम केले आहे. ‘चार दिवस सासूचे’ या मालिकेतील तिची भूमिका गाजली. ‘वाट बघतोय रिक्षावाला’ या तिच्या गाण्याला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. तिच्या अभिनयाबरोबरच अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळेदेखील मोठ्या चर्चेत असते. त्याबरोबरच मानसी नाईक सोशल मीडियावरदेखील सक्रिय असते. रीलच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या ती भेटीला येत असते. आता अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडीओ चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.

काय म्हणाली अभिनेत्री?

अभिनेत्री मानसी नाईकने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिने आकाशी रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे. या परकर-पोलक्यामध्ये ती सुंदर दिसत आहे. मानसीने दोन वेण्या घातल्या असून, त्यामध्ये गजरा माळला आहे. कपाळावर टिकली, गळ्यात नाजूक हार व हातात बांगडी, असा तिचा लूक पाहायला मिळत आहे. त्याबरोबरच चिंचेची झाडे व आजूबाजूचे शेत या सगळ्यामुळे हा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. या व्हिडीओला ‘गोजिरी’ हे गाणे लावण्यात आले आहे. या सगळ्यात मानसीने व्हिडीओला दिलेले कॅप्शन चर्चेचा भाग बनत आहे. अभिनेत्रीने लिहिले, “तुमच्या घाबरलेल्या, डिप्रेस झालेल्या आणि अतिविचार करणाऱ्या मनाला असं वाटतं की, माझी वाट लागणार आहे. तुमचं काही खरं नाही. तर त्या मनाला बिनधास्त सांगा की, माझा माझ्या कर्मावर विश्वास आहे. मी कोणाचं वाईट केलेलं नाही किंवा कोणाबद्दल वाईट विचार केला नाही. त्यामुळे माझं सगळं चांगलं होईल याची मला चांगलीच खात्री आहे.” पुढे तिने अभिनेत्री तेजा देवकर व लोकप्रिय गायिका वैशाली सामंत यांना टॅग करत हे तुमच्यासाठी आहे, असे लिहिले.

मानसी नाईकने शेअर केलेल्या व्हिडीओवर अभिनेत्री तेजा देवकरसह अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. तेजा देवकरने, “हे खूप क्यूट आहे”, असे लिहीत हार्ट इमोजी शेअर केला आहे. एका नेटकऱ्याने लिहिले, “महाराष्ट्राची अप्सरा.” आणखी एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिले, “खूप गोड आहेस तू.” तर अनेकांनी हार्ट इमोजी शेअर करीत अभिनेत्रीचे कौतुक केले आहे.

हेही वाचा: कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं भांडं फुटलं! कल्पना अर्जुनला वाजवणार कानाखाली अन् सायलीला…; ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मानसी नाईक सोशल मीडियावर रील्सच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसते.