scorecardresearch

“नवीन दाजी का?” घटस्फोटादरम्यान ‘त्या’ व्यक्तीबरोबर व्हिडीओ शेअर करताच मानसी नाईक ट्रोल, नेटकऱ्यांना झाली प्रदीप खरेराची आठवण

नव्या पोस्टमुळे मानसी नाईक ट्रोल, नेटकऱ्यांनी झाली प्रदीप खरेराची आठवण

manasi naik divorce manasi naik
नव्या पोस्टमुळे मानसी नाईक ट्रोल, नेटकऱ्यांनी झाली प्रदीप खरेराची आठवण

‘बाई वाड्यावर या’, ‘वाट बघतोय रिक्षावाला’ यांसारख्या गाण्यांमधून मानसी नाईकने प्रेक्षकांना अगदी वेड लावलं. मानसी तिच्या कामामुळे कायमच चर्चेत असते. पण गेल्या काही दिवसांपासून तिचं खासगी आयुष्य चर्चेचा विषय ठरत आहे. मानसी व तिचा पती प्रदीप खरेरा लवकरच घटस्फोट घेणार आहेत. सध्या या दोघांच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू आहे. यादरम्यान दोघांमध्ये सोशल मीडिया वॉर पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – “शाहरुख खान भारताचा…” ‘पठाण’ सुपरहिट ठरल्यानंतर किंग खानबाबत जॉन अब्राहमचं मोठं वक्तव्य

प्रदीप व मानसी सोशल मीडियाद्वारे एकमेकांवर अप्रत्यक्षपणे टीका करताना दिसतात. मानसीने प्रदीपबरोबरील नात्याबाबत काही मुलाखतीदरम्यान भाष्य केलं. पण प्रदीपने मात्र अजूनही यावर आपलं मौन कायम राखलं आहे. दरम्यान मानसीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक पोस्ट शेअर केली आहे.

ही पोस्ट तिच्या नवीन गाण्याबाबत आहे. तिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती गायक स्वरुप भालवणकरसह दिसत आहे. मानसीने स्वरुपच्या खांद्यावर हात टाकत व्हिडीओ शेअर केला आहे. मात्र हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मानसीला नेटकऱ्यांनी कमेंट्सच्या माध्यमातून एक प्रश्न विचारला आहे.

आणखी वाचा – विलेपार्लेच्या चाळीत राहते ‘चला हवा येऊ द्या’मधील प्रसिद्ध अभिनेत्री, म्हणाली, “आई दुसऱ्यांच्या घरी जेवण बनवायचं करायची काम अन्…”

नवीन दाजी का? असा प्रश्न मानसीला नेटकऱ्यांनी विचारला आहे. तसेच हा व्हिडीओ पाहून प्रदीप खरेराला वाईट वाटणार असंही काहींनी म्हटलं आहे. मानसी ‘दिल तुटा है तो क्या’ या गाण्यामधून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-01-2023 at 12:46 IST
ताज्या बातम्या