‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाला सध्या प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आतापर्यंत जवळपास ३७.३५ कोटींची कमाई केली आहे. केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’मध्ये सहा अभिनेत्रींनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. सध्या या सहा अभिनेत्रींचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. परंतु, चित्रपट पाहिल्यावर प्रत्येकीला शुभेच्छा देण्यासाठी एका मराठी अभिनेत्याने खास फोन केला होता. याविषयी अभिनेत्रींनी अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला आहे.

हेही वाचा : आर माधवनने पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसह काढलेल्या सेल्फीची चर्चा; फोटो शेअर करत म्हणाला…

‘बाईपण भारी देवा’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारलेल्या अभिनेत्री शिल्पा नवलकर ‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या, “चित्रपट पाहिल्यावर मला सर्वात पहिला फोन अंकुश चौधरीने केला होता. फोन केल्यावर त्याने माझ्या भूमिकेचे कौतुक केले, ही गोष्ट माझ्या कायम लक्षात राहणार आहे. माझेच नव्हे तर त्याने चित्रपटातील प्रत्येक अभिनेत्रीचे कौतुक केले.”

हेही वाचा : काजोलने करिअरमध्ये पहिल्यांदाच मोडली ‘नो-किसिंग पॉलिसी’; व्हायरल लिपलॉक सीनवर उत्तर देत म्हणाली, “लोक माझ्याबद्दल…”

सुकन्या मोने पुढे म्हणाल्या, “अंकुशने आम्हा सर्वांनाचा फोन केला होता. आम्हा ५ जणींना फोन करून त्याने आमचे कौतुक केले.” याविषयी सांगताना अंकुशची पत्नी आणि अभिनेत्री दीपा चौधरी म्हणाली, “अंकुशने केदारबरोबर माझ्याआधी हा संपूर्ण चित्रपट पाहिला होता. चित्रपट पाहिल्यावर तो माझ्या मालिकेच्या सेटवर आला आणि मला जेवायला घेऊन गेला. सहसा तो असं कधीच करत नाही. यानंतर चित्रपटाच्या प्रीमियरला तो रडला. त्यानंतर त्याने या प्रत्येकीला फोन केला होता.”

हेही वाचा : नाटय़रंग : ‘नियम व अटी लागू’ ; परस्पर समज-गैरसमजांचं हास्यस्फोटक रसायन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाचे कथानक महिलांच्या जीवनावर आधारलेले आहे. यामध्ये रोहिणी हट्टंगडी, दीपा चौधरी, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, वंदना गुप्ते आणि सुचित्रा बांदेकर यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.