मराठी चित्रपटातील विनोदाचा सम्राट अशी ओळख कमावलेले अभिनेता, दिग्दर्शक दादा कोंडके यांनी मराठी सिनेसृष्टीतच नव्हे तर हिंदी कलाकारांच्या मनावरही राज्य केलं आहे. दादा कोंडके यांचा चित्रपट प्रदर्शित होणार म्हटलं की, बॉलिवूडमधील अनेक निर्मात्यांना धडकी भरायची. दादा कोंडके यांच्या ९१ व्या जयंतीनिमित्त झी टॉकीजवर “ज्युबिली स्टार दादा” हा दादांच्या ६ सुपरहिट चित्रपटांचा सीझन सुरु झाला आहे. अभिनेते अशोक सराफ यांना दादा कोंडके यांनी एक सल्ला दिला आहे.

दादा कोंडके यांच्या विनोदाचा वारसा पुढे लाडके अशोक मामा म्हणजेच अशोक सराफ यांनी समर्थपणे पेलला. दादांच्या ९१ व्या जयंतीनिमित्त अशोक मामांनी दादांमधील विनोदी अभिनेत्याला सलाम करत त्यांच्या काही आठवणी शेअर केल्या. विनोदाची पेरणी योग्यरित्या कशी करावी, याचा मंत्र दादांनी अशोकमामांना दिला होता. तो मंत्र नेमका काय होता हे सांगताना अशोक मामा त्यांच्या आठवणीत भावूक झाले.
आणखी वाचा : “दादा कोंडकेंना अश्लील म्हणून हिणवलं…” किरण माने स्पष्टच बोलले, म्हणाले “उघडं सत्य बोलणारा एकही कलाकार…”

दादांना जशी विनोदाची नस सापडली होती, तशीच नस अशोक सराफ यांनाही सापडली होती. दादांच्या चाहत्यांमध्ये अशोक मामाही आहेत. यावेळी अशोक मामा म्हणाले, “दादांचा विनोद कधीच ओढून ताणून नव्हता. तर त्यामध्ये एक उत्स्फूर्तता होती. विनोदातील निखळता आणि विनोदी संवादातील उत्स्फूर्तता कशी आणायची, हे मी दादांकडे पाहून शिकलो. दादांनी जणू मला हा गुरुमंत्रच दिला होता.”

“दादांमध्ये खूप टॅलेंट होतं. दादा पडद्यावरच नव्हे तर व्यक्तीगत आयुष्यातही हजरजबाबी होते. बोलताना त्यांना सहज विनोद सुचत. मला त्यांच्यातील आवडणारी गोष्ट म्हणजे त्यांनी बहुतांश चित्रपट विनोदी ढंगातील करुनही त्यांचा विनोद प्रत्येकवेळी नवीनच वाटला. सिनेमाच्या स्क्रीप्टवर त्यांची पकड होती. त्यामुळे प्रत्येक सीन पडद्यावर कसा दिसणार हे त्यांना आधीच कळायचं. लेखक राजेश मुजूमदार यांच्या साथीने दादांनी प्रत्येक सिनेमात कमाल केली आहे. दादांची हीच कमाल आता झी टॉकीजमुळे पुन्हा अनुभवता येणार याचा मला आनंद आहे.” असे अशोक सराफ म्हणाले.

आणखी वाचा : “त्यांच्याकडे कोणी बोट दाखवू नये म्हणून…” शक्ती कपूर यांनी सांगितला दादा कोंडकेंचा किस्सा, म्हणाले “देवाने अशी माणसं…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान दादांच्या विनोदातील सहजता लोकांना इतकी भावली की दादांचा सिनेमा म्हणजे ज्युबिली स्टार हे समीकरणच झालं. ‘पांडू हवालदार’ या चित्रपटाने अशोक सराफ यांच्या कारकीर्दीला कलाटणी दिली. ‘तुमचं आमचं जमलं’, ‘पांडू हवालदार’ आणि ‘राम राम गंगाराम’ या तीन चित्रपटात अशोक मामांनी दादांसोबत काम केलं.