आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा सुप्रसिद्ध अभिनेता म्हणजे चिन्मय मांडलेकर. त्याने लेखन, दिग्दर्शन, अभिनय, निर्मिती अशा अनेक बाजू समर्थपणे सांभाळल्या आहेत. सध्या चिन्मय मांडलेकर हा ‘सुभेदार’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्याने एक खास पोस्ट शेअर केली आहे.

चिन्मय मांडलेकर हा सध्या ‘शिवराज अष्टक’ या चित्रपटांच्या सीरिजमध्ये झळकत आहे. यात तो छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. याच ‘शिवराज अष्टक’ या सीरिजमधील ‘सुभेदार’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा आज पुण्यात पार पडत आहे. त्या निमित्ताने चिन्मयने पुण्याबद्दलचा एक खास अनुभव सांगणारी पोस्ट केली आहे.
आणखी वाचा : “निष्पाप मुलाचा उल्लेख ‘कार्ट’ म्हणून…” जहांगीर नावावरुन ट्रोल करण्यांवर चिन्मय मांडलेकरची पत्नी संतापली

चिन्मयने इन्स्टाग्रामवर पुण्यातील नळ स्टॉप या बस स्थानकाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोवर पु. ल. देशपांडे यांचं एक वाक्य लिहिलं पाहायला मिळत आहे. “मराठीला जी ‘मज्जासंस्था’ वाटते, तीच इंग्रजीला ‘नर्वस सिस्टम’ वाटते. फक्त दृष्टीकोनाचा फरक आहे”, असे त्यावर लिहिल्याचे पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा : “दिग्पाल लांजेकरच्या चित्रपटामुळे कधीही…” ऐतिहासिक चित्रपटाच्या वादावर चिन्मय मांडलेकरची सावध प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या फोटोला चिन्मयने हटके कॅप्शन दिले आहे. “पुणे शहर, सिग्नलला थांबलेलं असताना ही कधी कधी शिकवण देतं!” , असे कॅप्शन चिन्मयने या फोटोला दिले आहे. त्याबरोबरच त्याने पुणे तिथे काय उणे असा हॅशटॅगही दिला आहे. चिन्मयच्या या फोटोवर अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. सध्या त्याची ही पोस्ट व्हायरल होत आहे.