मालिका, नाटक, चित्रपटासह वेब सीरिज अशा सर्वच क्षेत्रात काम केलेला अभिनेता म्हणून जितेंद्र जोशीला ओळखले जाते. त्याने मराठीप्रमाणेच हिंदी कलाविश्वातही त्याचे अढळ स्थान निर्माण केले आहे. यामुळेच त्याचा फार मोठा चाहतावर्ग आहे. जितेंद्र जोशीच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्याने पत्नीसाठी खास पोस्ट केली आहे.

जितेंद्र जोशीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने पत्नीबरोबरचा एक सुंदर फोटो पोस्ट केला आहे. याला कॅप्शन देताना त्याने लग्नाला १४ वर्षे पूर्ण झाल्याचे सांगितले आहे.
आणखी वाचा : “मला अमेय खोपकरांनी फोनवरुन धमकी दिली”, प्रसिद्ध मराठी दिग्दर्शकाचा गौप्यस्फोट, म्हणाले “मी कुशलला…”

जितेंद्र जोशीची पोस्ट

“खरंच. १ लाख २२ हजार ६४० तास, ५११० दिवस आणि १४ वर्ष. मला अजूनही आठवतंय की कोणीतरी सांगितले होते की हे वर्षभरही चालणार नाही. मला त्या सर्वांबद्दल खूप वाईट वाटते कारण मी किंवा आपण किंवा ते आपल्यासाठी निर्णय घेत नाहीत, तर देव आणि एक पवित्र ऊर्जा आहे.

माझा असा विश्वास आहे की एक व्यक्ती म्हणून आपण वेगवेगळ्या कारणांनी बदलत राहतो. पण आपला आत्मा तसाच राहतो. कुठेतरी, कधी कधी आपण कोणाकडून काहीतरी मागतो किंवा शोधतो.

कधी कधी आपण एकमेकांपासून खूप दूर जातो किंवा इतके जवळ येतो की आपण एकमेकांना पाहूही शकत नाही. परंतु ही कर्मशक्ती आहे, जी एका हेतूसाठी कार्य करत आहे. कदाचित तू मला चांगला माणूस बनवणं, हाच मला भेटण्याचा उद्देश आहे. कारण एक चांगला माणूस होण्यासाठी मला अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. या कडू ते चांगल्या प्रवासासाठी धन्यवाद.

धन्यवाद मिताली.. तुम्हाला अधिक यश आणि आनंद मिळो. लग्नाच्या १४ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा”, असे जितेंद्र जोशीने म्हटले आहे.

आणखी वाचा : Video : सई ताम्हणकरने मुंबईत खरेदी केलं हक्काचं घर, जुन्या घराला ‘गुडबाय’ करताना म्हणाली “भूतकाळातील…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान जितेंद्र जोशीच्या पत्नीचे नाव मिताली जोशी असे आहे. ती चित्रपट आणि नाटकांचे लेखन करतात. त्यासोबतच काही नाटकांचे दिग्दर्शनही तिने केले आहे.