मराठी मालिका, चित्रपटांमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणून संतोष जुवेकरला ओळखले जाते. त्याने ‘झेंडा’, ‘मोरया’, ‘एक तारा’ आणि ‘रेगे’ यासारख्या अनेक मराठी चित्रपटात दमदार भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडूनही खूप चांगली पसंती मिळाली. संतोष जुवेकर हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच संतोषने त्याच्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र त्या शुभेच्छाच्या पोस्टने सर्व चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

दिवाळीच्या निमित्ताने अनेक कलाकारांनी त्यांच्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी त्यांचे अनेक गोड फोटोही शेअर केले आहेत. मात्र संतोष जुवेकरच्या पोस्टने त्याने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. सध्या तो त्याच्या ३६ गुण या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर पूर्वा पवार झळकणार आहे. समित कक्कड दिग्दर्शित हा चित्रपट लग्न, प्रेम आणि लिव्ह इन रिलेशनशिपवर भाष्य करणारा आहे. या चित्रपटात काही बोल्ड दृश्य दाखवण्यात आल्यामुळे तो चर्चेत आहे. संतोष जुवेकरने दिवाळीचे निमित्त आणि ३६ गुण या चित्रपटाचे औचित्य साधत एक पोस्ट शेअर केली आहे.
आणखी वाचा : “दहा दिवस शिल्लक असताना…” राणादा आणि पाठकबाईंच्या गुपचूप साखरपुडा करण्यामागचे कारण समोर

संतोष जुवेकरने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. त्यात मध्ये ३६ असा आकडा लिहिण्यात आला आहे. त्याच्या आजूबाजूला अनेक कलाकारांची बोट पाहायला मिळत आहेत. या पोस्टला त्याने हटके कॅप्शन दिले आहे.

संतोष जुवेकरची पोस्ट

“उपकार नको आणि भोचकपणा अजिबातच नको.
जर आवडलं तरच शाब्बास म्हणा आणि नाही आवडलं तर………
मी पुन्हा प्रयत्न करेन आणि करत राहीन,
तुम्हाला मी आवडण्यासाठी.
तुम्ही फक्त माझ्या सोबत रहा.
खूप दिवस एकट्याने वाट पाहिली, आता तुम्ही साथ दिलीत तर सगळंच सार्थकी लागेल.
देणार ना साथ?
चला धमाका करूयात.
शुभ दीपावली तुम्हाला, लव्ह यू रे”, अशी पोस्ट संतोष जुवेकरने केली आहे. त्याची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.

आणखी वाचा : “गोव्याला गेलो तरी २० ते २५ हजार खर्च होतात मग…”, संतोष जुवेकरने चाहत्यांना केलं दत्तक पालक होण्याचे आवाहन

View this post on Instagram

A post shared by Santosh Juvekar (@santoshjuvekar12)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान काही महिन्यांपूर्वी संतोषचा ‘हिडन’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात संतोष जुवेकरने पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. त्यानंतर आता संतोष जुवेकर लवकरच ३६ गुण या चित्रपटात झळकणार आहे. ‘झेंडा’, ‘मोरया’, ‘एक तारा’ आणि ‘रेगे’ या मराठी चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांकडूनही खूप चांगली पसंती मिळाली होती.