सिद्धार्थ चांदेकर मराठी सिनेसृष्टीतला लोकप्रिय अभिनेता आहे. नुकताच त्याचा ‘झिम्मा २’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटातील सिद्धार्थच्या भूमिकेच सगळीकडून कौतुक करण्यात येत आहे. चित्रपटांबरोबर सिद्धार्थ त्याच्या वैयक्तीक आयुष्यामुळेही नेहमी चर्चेत असतो. काही महिन्यांपूर्वीच सिद्धार्थने त्याची आई सीमा चांदेकर यांच दुसरं लग्न लावून दिलं. सिद्धार्थने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमीही दिली होती. आता नुकत्याच एका मुलाखतीत सिद्धार्थने आईच्या दुसऱ्या लग्नावर पुन्हा एकदा भाष्य केलं आहे.

हेही वाचा- महाराष्ट्रापेक्षा लंडनमध्ये चित्रपटाचे शूटिंग करणं सोप्प का आहे? हेमंत ढोमेने स्पष्ट सांगितलं; म्हणाला, “आपली सिस्टीम…”

अलीकडेच सिद्धार्थने रेडिया मीर्चीला मुलाखती दिली. या मुलाखतीत त्याने त्याच्या करिअरबरोबर त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही अनेक खुलासे केले. यापूर्वी अनेक मुलाखतींमध्ये सिद्धार्थ त्याच्या आईच्या दुसऱ्या लग्न का लावलं यामागचं कारण सांगितलं होतं. मात्र या मुलाखतीत त्याने दुसऱ्या लग्नानंतर आईमध्ये नेमका काय बदल झाला याबाबत सांगितलं आहे.

सिद्धार्थ म्हणाला, “आईच्या दुसऱ्या लग्नानंतर १५ ते २० दिवसांनी मला तिचा जो चेहरा बघायला मिळाला तिचे जे डोळे बघायला मिळाले मला ते हवं होतं. लोक काय म्हणतील याच्याशी मला काहीही देणघेण नाहीये. तो त्यांचा प्रश्न आहे त्यांना पूर्ण अधिकार आहे. पण मला माहिती आहे माझी आई आत्ता एवढी आनंदी आहे जी गेली २० वर्ष नव्हती. गेली २० वर्ष तिने आम्हाला सांभाळण्यात, आमच्या करिअरपाई स्वत:च्या स्वप्नांचा त्याग करण्यात घालवले आहेत”

हेही वाचा- ‘झिम्मा २’ ची बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात, पहिल्या दिवशी चित्रपटाने केली ‘इतकी’ कमाई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिद्धार्थ पुढे म्हणाला, मला रोज दिवसातून आईचे चार ते पाच फोन यायचे. आता मी आईला फोन करतो. ती आनंदी आहे. ती तिचा संसार करते. मला वडील मिळाले नाहीत आणि मला वडील नकोयेत. माझ्या आईला पार्टनर मिळाला आहे आणि त्यासाठी मी खूप आनंदी आहे.