अभिनेता सिद्धार्थ जाधव सध्या त्याच्या आगामी ‘बालभारती’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याचा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मुलांच्या कलागुणांना वाव देताना भाषेच्या अडचणीमुळे काय परिणाम होतो? यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. याच चित्रपटाच्यानिमित्ताने ‘बालभारती’च्या संपूर्ण टीमने ‘लोकसत्ता’शी संवाद साधला. यावेळी सिद्धार्थने त्याची पत्नी तृप्तीबाबत भाष्य केलं आहे.

आणखी वाचा – Akshaya Hardeek Wedding : ‘हळद लागली, हळद लागली…’ नवरदेव बसला पाटावर, हार्दिक जोशीच्या हळदी कार्यक्रमाची खास झलक

सिद्धार्थला स्वरा व इरा अशा दोन मुली आहेत. दोन मुलींच्या शिक्षणाची जबाबदारीही पत्नीच सांभाळते असंही सिद्धार्थने यावेळी सांगितलं. सिद्धार्थ म्हणाला, “मुलगी होण्यापूर्वीच तृप्तीचं (पत्नी) ठरलं होतं की मुलांना चांगल्या शाळेमध्येच शिक्षण द्यायचं. स्वरा माझी पहिली मुलगी. दुसऱ्या मुलीचं नाव इरा. पण दोघींचंही शिक्षण चांगलं व्हावं हे तृप्तीने मनाशी ठाम केलं.

“माझ्या दोन्ही मुली ‘बॉम्बे स्कॉटीश’ शाळेमध्ये इंग्रजी माध्यमामध्ये आहेत. मुलींच्या संपूर्ण शिक्षणासाठी तिने प्लॅन तयार केला होता. त्यामध्ये माझा फक्त ‘हो’ म्हणजेच माझा होकार एवढाच वाटा होता. नवऱ्याचं असंही फक्त ‘हो’च असतं. कारण खऱ्या अर्थाने नवरा बाहेर खूप काम करत असतो.”

आणखी वाचा – “विक्रम गोखले व माझे वडील भाऊ नव्हते आणि…” चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर सखी गोखले संतापली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे सिद्धार्थ म्हणाला, “घर संपूर्ण एक स्त्री सांभाळते. माझ्या संसारात तसेच मुलींच्या शिक्षणामध्ये तृप्तीचा फार मोठा वाटा आहे. माझ्या मुलींच्या शिक्षणाचा भार तृप्तीनेच उचलला आहे. तृप्ती माझ्यापेक्षा खूप हुशार आहे. ती पत्रकारही होती. मी बाहेर काम करत असताना मुलींचं शिक्षण, अभ्यास तिच पाहते. मीही तिच्या प्रत्येक निर्णयाला हो म्हटलं. कारण मला माहित आहे की तृप्तीचे निर्णय कधीच चुकत नाहीत.” सिद्धार्थच्या दोन्ही मुली इंग्रजी माध्यमामध्ये आहेत. तसेच तृप्तीसह तो सुखाचा संसार करत आहे.