scorecardresearch

Premium

सुबोध भावे हिंदी चित्रपटामध्ये का नाही दिसत? अभिनेता कारण सांगत स्पष्टच म्हणाला…

अभिनेता सुबोध भावे म्हणाला, “अक्षय कुमारच्या भावाची भूमिका करण्यात शून्य रस…”

Marathi actor Subodh Bhave is not working in Hindi movie know
अभिनेता सुबोध भावे म्हणाला, "अक्षय कुमारच्या भावाची भूमिका करण्यात शून्य रस…"

मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक म्हणजे सुबोध भावे. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर सुबोध भावे मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनात अटळ स्थान निर्माण केलं. नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये विविधांगी भूमिका अभिनेत्याने साकारल्या आहेत. अभिनेत्यासह तो एक उत्कृष्ट दिग्दर्शक देखील आहे. त्याने दिग्दर्शित केलेल्या’ कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटाचे चांगलंच कौतुक झालं होतं. त्यानंतर आता लवकरच सुबोधचा ‘मानापमान’ संगीतमय चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अशातच अभिनेत्याने तो हिंदी चित्रपटांमध्ये का दिसत नाही? यामागचं कारण स्पष्ट केलं आहे.

अभिनेता सुबोध भावे नुकताच ‘इसापतीनी एंटरटेन्मेंट’ या युट्यूब चॅनेलवरील छापा काटा या कार्यक्रमात सहभागी झाला होता. त्यावेळी त्याला विचारलं गेलं की, सुबोध भावे हिंदी चित्रपटामध्ये का नाही दिसत? यावर अभिनेता म्हणाला, “असं काही नाहीये. मी कुठलीच गोष्ट ठरवून केली नाहीये, की आता हे करायचं आहे म्हणून हे करतोय किंवा पुढे कधीतरी करायचं आहे म्हणून आतापासून तयारी करतोय. ज्या ज्या गोष्टी मनाला भिडत गेल्या, ज्या आवडत गेल्या, ज्या मनापासून कराव्याशा वाटल्या त्या त्या करतोय.”

shahid-kapoor-rang-de-basanti
‘रंग दे बसंती’ चित्रपटाला नकार देण्याचा शाहिद कपूरला होतोय पश्चात्ताप; अभिनेता म्हणाला, “दुर्दैवाने मला…”
Aata Vel Zaali movie pramotion
इच्छामरणाचा अधिकार मागणाऱ्या जोडप्याची गोष्ट
Mahesh Manjrekar
कधी तरी मरू या भीतीमुळे आजचं जगणं कधीच थांबवू नये – महेश मांजरेकर
snehal sidham in Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya
वनिता खरात, प्रियदर्शनीनंतर शाहीद कपूरच्या चित्रपटात ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी! म्हणाली, “कळवायला उशीर…”

हेही वाचा – रेश्मा शिंदेबरोबरच्या अफेअरच्या चर्चांवर अखेर अक्षर कोठारीने सोडलं मौनं; अभिनेता म्हणाला, “माझी रेश्मा…”

पुढे सुबोध म्हणाला, “हिंदी करावसं वाटतं नाही, त्यांच्यावर राग आहे याच्यापेक्षा मला असं वाटतंय की, मला अभिनेता म्हणून काम मिळालं पाहिजे. फक्त हिंदी भाषा आहे म्हणून मला काम नाही करायचंय. तिथे मला अक्षय कुमारच्या भावाची भूमिका करण्यात शून्य रस आहे. माझ्या अभिनेत्याचा मान ठेवून तिथे मला एखादी भूमिका मिळणार असेल, जी मी ‘ताज: डिवायडेड बाय ब्लड’मध्ये बिरबलाची भूमिका केली किंवा आता ‘सजनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ’मध्ये एक अप्रतिम भूमिका माझ्या वाट्याला आली. अजून एक चित्रपट आहे, आता मी त्याच्याबद्दल बोलणार नाही, त्याच्यामध्ये खूप सुंदर भूमिका आहे. असं काहीतरी असेल तर मी करेन. उगाच मी हिंदी आहे म्हणून वाटेल ते करणार नाही.”

हेही वाचा – Video: लेकीबरोबर डान्स करतानाचा ऐश्वर्या राय-बच्चनचा व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले, “कधी तरी मुलीला…”

“मी मराठीत फार उत्तम भूमिका करतो आणि मला स्वतःला पाहिजे त्या पद्धतीने मराठीमध्ये शोधता येतंय, स्वतःला घडवता येतंय. तर मी तिथे हिंदी आहे, उगाच बरी मोठी नाव आहेत आणि त्यांच्या कुठल्या तरी एका मित्राचा किंवा भावाचा वगैरे नाही करणार. मला हिंदी भाषा आहे म्हणून शून्य रस आहे. त्यांना करायचं असेल तर त्यांनी इथे मराठीत येऊन काम करावं. मी तिकडे जाऊन नाही करणार. त्यामुळे जेव्हा माझ्यातल्या अभिनेत्याचा मान ठेवून मला भूमिका मिळेल तेव्हा मी नक्की करेन,” असं स्पष्टच सुबोध भावे म्हणाला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Marathi actor subodh bhave is not working in hindi movie know pps

First published on: 06-12-2023 at 13:06 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×