मराठी सिनेसृष्टीची अप्सरा म्हणून सर्वांची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला ओळखले जाते. तिने तिच्या अभिनय कौशल्याच्या जोरावर आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. सोनाली कुलकर्णी आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. तिचे अनेक चाहते तिला शुभेच्छा देताना दिसत आहेत. सोनाली कुलकर्णी आणि अमृता खानविलकर या दोघींमध्ये काहीतरी बिनसल्याची चर्चा कायम रंगताना दिसते. काही महिन्यांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत अमृताने सोनालीबद्दल भाष्य केले होते.

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अभिनेत्री अमृता खानविलकर या दोघीही कायमच चर्चेत असतात. या दोघीही मराठी सिनेसृष्टीच्या आघाडीच्या नायिका आहेत. पण या दोघींमध्ये काहीतरी बिनसल्याची चर्चा कायमच रंगताना दिसते. अमृता खानविलकरने ‘बस बाई बस’ या कार्यक्रमात सहप्रवाशी म्हणून सोनाली कुलकर्णीशी संवाद साधला होता. त्यावेळी सोनाली कुलकर्णीचा फोटो पाहताच अमृता खळखळून हसली होती.
आणखी वाचा : Video : रेल्वेतील डिजीटल बोर्डवर मराठीतील सूचना पाहून अभिनेता संतप्त, म्हणाला “चौथीतील मुलांकडून लिहून घेतलं असतं तर…”

त्यानंतर अमृता म्हणाली होती की, ‘जेव्हा ती येईल तेव्हा तुम्ही माझा फोटो द्याल, असं वचन द्यायला हवं.’ त्यावर सुबोध भावे ‘देऊ, आम्हाला काहीही अडचण नाही’ असं म्हणाला. ‘अनेकांना हे माहिती नाही पण मी तिला सोना असंच म्हणते. तुम्ही नि:शब्द करुन टाकलंय मला हा फोटो दाखवून.’ त्यावर सुबोधने “तिला दोन प्रवासी काहीही न बोलता झोपूनही जाऊ शकतात. बोललंच पाहिजे असं काहीही नाही”, असे सांगितले. पण तरीही तिने सोनालीशी फार छान संवाद साधला.

आणखी वाचा : “काही दिवसांनी असे लोक रस्त्यावर सेक्स करतील”, प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या पोस्टवर नेटकऱ्याची कमेंट, उत्तर देत म्हणाली “स्त्रियांबद्दल…”

अमृता खानविलकर सोनालीबद्दल काय म्हणालेली?

“सोना… कुठून सुरुवात करायची गं? हे फार विनोदी आहे ना की तुझा आणि माझा प्रवास खूप एकत्रच सुरु झाला. तू देखील तितकेच उतार चढाव पाहिलेत जितके मी पाहिलेत. सर्वात आधी तुझे अभिनंदन मी तुझ्या लग्नाचे, हनिमूनचे फोटो मी बघितले आणि फार कडक दिसत होतीस तू… आणि काय सांगू तुला?? एकदा बॅकस्टेज तू आणि मी आपण भेटलो होतो तेव्हा तू मला सांगितलं होतंस की आजही लोकांना तुला आणि मलाच एकत्र बघायचं अमृता….आणि त्या गोष्टीवर मी आजही ठाम आहे.

मला या गोष्टीचा फार आनंद आहे की तिही माझ्यासारखी जिद्दी आहे, मेहनती आहे. कधीतरी ती पुढे, मी मागे, तर कधी मी पुढे, ती मागे…असं आमचं सतत सुरु असतं. पण मला फार आनंद आहे की मी तिच्यासारख्या अतिशय सक्षम अभिनेत्रीबरोबर माझं वन ऑन वन सुरु असतं. आता जर ती इथे असती तर तिचं यावर फार वेगळं म्हणणं असतं. एक गंमतीशीर गोष्ट आहे की सोनाला माहिती असतं की मी काय बोलणार आहे आणि मला माहिती असते की ती काय बोलणार आहे. तुम्ही पाहाल तर आम्ही मैत्रीणीही आहोत आणि नाही देखील”, असे अमृता खानविलकरने म्हटले होते.

आणखी वाचा : “एकनाथ शिंदे साहेब मला तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता, पण…” मराठी अभिनेत्रीच्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाली “चार हात, दोन फोन, एक नाथ…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान याच कार्यक्रमात सोनाली कुलकर्णी सहभागी झाली होती. त्यावर सोनालीने आम्ही एकत्र काम केलं असतं तर नक्कीच मैत्री झाली असती. आमच्यात वैरही नाही, असे स्पष्टपणे सांगितले होते. त्यानंतरच त्या दोघींमध्ये काहीतरी वाद असल्याची चर्चा रंगण्यास सुरुवात झाली. मात्र त्यावर त्या दोघींनीही काहीही भाष्य केले नव्हते.