मधुरा वेलणकर-साटम मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. मधुरा ही ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर आणि रजनी वेलणकर यांची कन्या आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर मधुराने मराठी मनोरंजनसृष्टीत वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मधुराने अभिनेते शिवाजी साटम यांचा मुलगा अभिजीत साटमबरोबर लग्नगाठ बांधली. दरम्यान, एका मुलाखतीत मधुराने तिच्या लग्नाचा एक किस्सा सांगितला आहे.

हेही वाचा- “मी फक्त…”, ‘झिम्मा २’ पाहिल्यानंतर निर्मिती सावंतच्या रिअल लाईफ सूनेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली…

नुकतंच मधुरा आणि अभिजीत यांनी लोकमत फिल्मीच्या लव्ह गेम लोचा कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत. दरम्यान, मधुराने त्यांच्या लग्नाबाबतचा एक किस्साही सांगितला आहे. मधुरा म्हणाली, आम्हा दोघांना देवळात लग्न करायचं होतं, १० ते १४ माणसांना बोलवून. पण, आमच्या घरातील मी शेवटची मुलगी आणि अभिजीत त्यांच्या घरातला मोठा मुलगा, त्यामुळे त्याच्या घरातलं ते पहिलं लग्न होतं. त्यामुळे आमच्या आई-वडिलांना ते मान्य नव्हतं. देवळात करायचं लग्न शेवटी आम्ही ६०० माणसांमध्ये केलं.”

मधुरा पुढे म्हणाली, एका पॉईंटला आम्ही सोडून दिलं म्हणलं त्यांना ज्यांना बोलवायचं आहे त्यांना बोलवू दे. माझ्या मोठ्या बहिणीच्या लग्नात १७०० माणसं होती. शेवटी तिच्या लग्नात बाकीच्या माणसांना जागाच नव्हती. त्यामुळे काही जणांना , तुमचं झालं असेल तर निघा, अशी आम्ही विनंती केली. आमच्या लग्नात दोघांची मिळून ६०० माणसं होती. त्यामुळे ६०० म्हणजे खूपच कमी झाली.”

हेही वाचा- लोकप्रिय मराठी अभिनेत्याचा पार पडला साखरपुडा! स्पृहा जोशीच्या ‘त्या’ कमेंटने वेधलं लक्ष, दोघांनी एकत्र केलंय काम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मधुरा वेलणकरच्या कामाबद्दल बोलायच झालं तर मधुरा नाटक, मालिका, चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच मनोरंजन करत आली. मृण्मयी’ या मराठी मालिकेद्वारे तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले. आतापर्यंत मधुराने. मालिकांबरोबर अनेक सुपरहिट चित्रपटातही मुधुराने महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘अधांतरी’, ‘खबरदार’, ‘मातीच्या चुली’, ‘सरीवर सरी’, ‘उलाढाल’, ‘एक डाव धोबीपछाड’, ‘हापूस’ या चित्रपटांमधील तिच्या भूमिका चांगल्याच गाजल्या.